फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मोहालीमध्ये शंभरावी टेस्ट खेळणार आहे. 100 टेस्ट खेळणारा विराट हा 12 वा भारतीय असेल. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन असलेला विराट हा जगातील ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराटची खेळाबद्दलची कमिटमेंट ही सर्वोच्च आहे. अगदी वडिलांचे निधन झाल्यावरही विराटनं ती मॅच पूर्ण केली होती. विराटच्या जुन्या सहकाऱ्यानं 16 वर्षांपूर्वीचा तो किस्सा सांगितला (Virat Kohli Father Death Incident) आहे.

रडून डोळे सुजले होते!

हा प्रसंग 2006 सालामधील आहे. विराट तेव्हा फक्त 17 वर्षांचा होता. तो दिल्ली विरूद्ध कर्नाटक (Delhi vs Karnataka) या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये दिल्लीकडून खेळत होता. विराटच्या तेव्हाच्या टीममधील सहकारी पुनीत बिश्टने (Punit Bisht) 16 वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग सांगितला आहे.

कर्नाटक विरूद्धच्या रणजी ट्रॉफी मॅचचा तो तिसरा दिवस होता. त्या दिवशी पुनीत ड्रेसिंग रूममध्ये पोहचला तेव्हा विराट एका बाजूला बसला होता. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. ते पाहून काही तरी अघटीत घडलंय याची जाणीव पुनीतला झाली. विराटच्या वडिलांचं काही तासांपूर्वी निधन झाले होते. आदल्या दिवशी विराट आणि पुनीत हे दोघं नाबाद होते. नव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी विराटवर दु:खाचा डोंगर (Virat Kohli Father Death Incident) कोसळला होता.

‘विराट’ मनाचा कोहली, भारतीय क्रिकेटपटूच्या आईच्या उपचारासाठी केली लाखोंची मदत

आम्ही सुन्न होतो!

सध्या मेघालयकडून खेळत असलेल्या पुनीतनं सांगितलं की, ‘विराट कोहलीमध्ये त्या क्षणी मैदानात उतरण्याची हिंमत कशी झाली असेल याचा मी आजही विचार करतो. आम्ही सर्व सुन्न झालो होतो. पण, विराट बॅटींगसाठी मैदानात जाण्याची तयारी करत होता. त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार झाले नव्हते. तरीही तो मैदानात उतरणार होता. त्या मॅचमध्ये दिल्लीची अवस्था खराब होती. आपल्या अनुपस्थितीमुळे टीमचे नुकसान होऊ नये, अशी त्याची इच्छा होती,’ असे पुनीतने सांगितले.

दिल्लीच्या तत्कालीन टीमचा कॅप्टन मिथून मन्हास आणि कोच चेतन चौहान यांनीही विराटला घरी जाण्याचा सल्ला दिला होता. पुनीत त्याबद्दल सांगतो की, ‘इतक्या लहान वयात एवढा मोठा धक्का पचवणे सोपे नाही, असं चेतन सर आणि मिथून भाई या दोघांचंही मत होतं. विराटनं घरी जावं, असंच टीममधील सर्वांचं मत (Virat Kohli Father Death Incident) होतं. पण तो विराट कोहली होता. तो वेगळ्याच मानसिकतेचा व्यक्ती आहे.’

कसा खेळला विराट?

विराट त्या प्रसंगी कसा खेळला हे देखील पुनीतच्या लक्षात आहे. ‘विराटनं त्याचं दु:ख बाजूला ठेवून खेळण्याचा कणखरपणा दाखवला. त्याने काही चांगले शॉट्स लगावले. आमच्यामध्ये मैदानात खूप कमी चर्चा झाली. आपल्या आऊट व्हायचं नाही, जास्त वेळ खेळायचं आहे, इतकंच तो सांगत असे.

मला काय करावं हे समजतं नव्हतं. माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवून त्याचं सांत्वन करावं असं माझं मन माला सांगत होतं. पण, त्याचवेळी आपल्या कामामध्ये अधिक फोकस केलं पाहिजे, हे मेंदू बजावत होता. आज इतक्या वर्षांनीही विराट त्या 17 वर्षांच्या मुलासारखा आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.’ अशी भावना पुनीतनं बोलून दाखवली.

‘विराट कोहलीनं सचिनसारख्याच चांगल्या आठवणी दिल्या आहेत’

पुनीत बिष्टनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 4 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. आजही त्याला त्या मॅचमधील विराट सोबत केलेली 152 रनची पार्टनरशिप (Virat Kohli Father Death Incident) सर्वात खास वाटते. पुनीतनं त्या मॅचमध्ये 156 तर विराटनं 90 रन केले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%