फोटो – सोशल मीडिया

कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सलग चार पराभवानंतर अखेर विजय मिळवलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये केकेआरनं पंजाब किंग्जचा (PBKS) 5 विकेट्सनं पराभव केला. या विजयानंतर इऑन मार्गनची (Eoin Morgan) टीम आठव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये मॉर्गननं ‘कोड वर्ड’ चा वापर करत बाहेरुन घेतलेली मदत चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यानं या विषयावरुन मॉर्गनला फटकारलं (Sehwag on Morgan) आहे.

काय घडला प्रकार?

कोलकाता नाईट रायडर्सची फिल्डिंग सुरु असताना हा प्रकार घडला. केकेआरची रणनीतीकार (Analyst) नॅथन लीमन हे बोर्ड घेऊन बसले होते. त्या बोर्डवर 5 आणि 4 हे आकडे लिहिले होते. हा प्रकार पाहून टीव्हीर कॉमेंट्री करणाऱ्यांनी त्यांना वाटतोय तो अर्थ सांगितला. पण, त्या बोर्डचा नेमका अर्थ मॉर्गन, लिमन आणि केकेआरच्या मंडळींनाच माहिती आहे.

सेहवागनं फटकारलं

वीरेंद्र सेहवागनं या मॅचनंतर cricbuzz शी बोलताना या मॉर्गनच्या कोड वर्डवर (Sehwag on Morgan)  नाराजी व्यक्त केली. “आपण या प्रकारची कोड भाषा फक्त लष्करात बघितली आहे. माझ्या मते तो विशिष्ट वेळात कोणत्या बॉलरचा वापर करावा याबाबत दिलेला संदेश होता. मॅनेजमेंट आणि कोच या माध्यमातून डगआऊटमधून कॅप्टनची मदत करत होते.

या प्रकारे कॅप्टनला बाहेरुन मदत करणे वावगं नाही. मात्र त्यांनी या प्रकारे बाहेरुन खेळाचं नियंत्रण घेतलं तर कुणीही कॅप्टन होईल. कॅप्टनला असलेल्या अधिकाराचं काय? त्याच्यासाठी (मॉर्गन) काहीही काम शिल्लक राहणार नाही. त्यानं ज्या निर्णय क्षमतेच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकला त्याचाही काही उपयोग नसेल.” असं स्पष्ट मत सेहवागनं मॉर्गनच्या कोड वर्डवर (Sehwag on Morgan) व्यक्त केलं.

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सच्या अपयशाचं मोठं कारण!

ही तर मॉर्गनची सवय!

आर. अश्विननं जोस बटलरला बॉल टाकण्यापूर्वी क्रिज सोडलं म्हणून 2019 च्या आयपीएलमध्ये रन आऊट केले होते. त्यानंतर अश्विनला ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ चे सल्ले देण्यात इंग्लंडचे खेळाडू आघाडीवर होते. त्यांचाच कॅप्टन इऑन मॉर्गन ‘कोड वर्ड’चा वापर मॅच सुरु असताना करतो. त्यावेळी यापैकी ही मंडळींनी ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ची आरडाओरड करत नाहीत.

काहीही झालं तरी ‘Spirit of Cricket’ जपलं पाहिजे!

मॉर्गनचा कोड वर्डचा वापर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मॉर्गन-लीमन जोडीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2020 साली झालेल्या सीरिजमध्ये देखील ‘कोड वर्ड’चा वापर केला होता. त्यावेळी देखील क्रिकेट विश्वातून मॉर्गनवर टीका झाली होती. या सर्व टीकेला फाट्यावर मारत मॉर्गननं पंजाब किंग्ज विरुद्ध तोच प्रकार पुन्हा एकदा केला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%