फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील 3 मॅचची वन-डे सीरिज आता सुरू होत आहे. टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर वन-डे सीरिज जिंकून या दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर आत्मविश्वास वाढलेल्या आफ्रिकेला मागील दौऱ्यातील वन-डे सीरिजमधील पराभवाचा बदला घेण्याची उत्तम संधी आहे. या वन-डे सीरिजनिमित्तानं टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत मिळवलेल्या 2 अविस्मरणीय विजयांची (3 memorable odis wins) उजळणी करू या

2 माजी कोचची दमदार कामगिरी

दक्षिण आफ्रिकेत वन-डे मॅचमध्ये पहिली सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड भारतीय महिला क्रिकेट टीमचे माजी कोच WV रमन (WV Raman) यांचा आहे. भारतीय टीम 1992 साली आफ्रिका दौऱ्यावर गेली होती तेव्हा त्या सीरिजमधील सेंच्युरियनमध्ये झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये त्यांनी ही सेंच्युरी झळकावली होती.

सेंच्युरियन वन-डेमध्ये टीम इंडियासमोर जिंकण्यासीठी 216 रनचे टार्गेट होते. डोनाल्ड, फॅनी डीव्हिलियर्स, ग्रेग मॅथ्यूज, ब्रायन मॅकमिलन यांच्या अटॅकसमोर चांगल्या सुरूवातीनंतर भारतीय मिडल ऑर्डर गडगडली. त्या परिस्थितीमध्येही ओपनिंगला आलेल्या रमन यांनी एक बाजू लावून धरत सेंच्युरी झळकावली. त्यांनी 6 फोर आणि 1 सिक्ससह 114 रन काढले.

रमन यांच्या सेंच्युरिनंतरही टीम इंडियाचे माजी  कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची शेवटच्या ओव्हर्समधील फटकेबाजी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली. शास्त्री यांनी 16 बॉलमध्ये नाबाद 27 रन करत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब (3 memorable odis wins) केले.

कोहलीची किंग स्टाईल सेंच्युरी

टीम इंडिया 2018 साली दक्षिण आफ्रिकेत वन-डे सीरिज खेळली त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्मात होता. त्या सीरिजमधील पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 270 रनचे टार्गेट होते. त्या टार्गेटचा पाठलाग करताना रोहित शर्मा (20) आणि शिखर धवन (35) रन करत मोठा स्कोअर न करता आऊट झाले.

विराटच्या खेळावर याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने 119 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीने 112 रनची खेळी केली. विराटनं अजिंक्य रहाणे (79) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 189 रनची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपमुळे टीम इंडिया 46 व्या ओव्हरमध्येच ती मॅच 6 विकेट्सनं (3 memorable odis wins) जिंकली.

विराट कोहलीच्या नव्या इनिंगमधील सर्वात मोठा अडथळा

मुनाफचा मॅजिक स्पेल

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत सर्वात अविस्मरणीय विजय मिळवून देण्याचे श्रेय फास्ट बॉलर मुनाफ पटेलचे (Munaf Patel) आहे. दोन्ही टीममध्ये जोहान्सबर्गमध्ये 2011 साली झालेली वन-डे अतिशय थरारक झाली होती. या वन-डेमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणारी टीम इंडिया फक्त 190 रनवर आऊट झाली होती.

191 रनचा पाठलाग करताना 32 ओव्हरनंतर आफ्रिकेचा स्कोअर 4 आऊट 152 होता. त्यावेळी आफ्रिका सहज मॅच जिंकणार असाच सर्वांचा अंदाज होता. 33 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) मुनाफने आऊट केले आणि मॅचचं चित्रंच बदललं. त्यानंतर आफ्रिकेची संपूर्ण बॅटींग कोसळली. टीम इंडियानं अवघ्या 1 रननं थरारक विजय (3 memorable odis wins) नोंदवला. 29 रन देत 4 विकेट्स घेणाऱ्या मुनाफला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version
%%footer%%