फोटो – X

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट रांचीमध्ये सुरु होतीय. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये भारतीय टीम 2-1 नं सध्या आघाडीवर आहे. आता रांचीमधील टेस्ट जिंकून मालिका खिशात घाण्याची संधी टीम इंडियाला आहे.

श्रेयस अय्यरला काय झालं?

भारतीय टीम सीरिजमध्ये आघाडीवर आहे. पण, खेळाडूंचे प्रश्न काही सुटलेले नाहीत. केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर आहे. इशान किशननं फर्स्ट क्लास क्रिकेटकडं दुर्लक्ष केलंय. त्यातच श्रेयस अय्यरबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.

दोन टेस्टनंतर उर्वरित सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी त्यामध्ये श्रेयसचं नाव नव्हतं. बीसीसीआयनं त्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण, तो दुखापतीमुळे टीमच्या बाहेर गेल्याचं मानलं जात होतं.

IND vs ENG: उर्वरित 3 टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरबाबत संभ्रम

श्रेयसला दुसऱ्या टेस्टच्या दरम्यान पाठदुखीचा त्रास झाला होता. त्याला टीममधून वगळल्यानंतर मुंबईकडून रणजी मॅच खेळण्याची सूचना देण्यात आली होती. पण तो शेवटचा साखळी सामना खेळला नाही. त्याचबरोबर क्वार्टर फायनलही खेळणार नाही.

श्रेयसनं पाठदुखीचं कारण न देत रणजी क्वार्टर फायनल खेळू शकत नसल्याचं मुंबईच्या निवड समितीला कळवलंय. पण, त्याबाबत नवा गौप्यस्फोट झालाय.

‘इंडियन एक्स्प्रेस’ मधील वृत्तानुसार श्रेयसला कोणतीही दुखापत नाही, तो फिट आहे. असं नॅशनल क्रिकेट अकादमीनं (NCA) बीसीसीआयला कळवलं आहे.

काय आहे रिपोर्ट?

NCA च्या स्पोर्ट्स सायन्स विभागाचे प्रमुख आणि टीम इंडियाचे माजी सीईओ नितीन पटेल यांनी बीसीसीआयला ईमेल लिहिला आहे. श्रेयसनं दुखापतीचं कारण देत रणजी क्वार्टर फायनलमधून माघार घेतल्यानंतर एक दिवसांनी त्यांनी हा मेल लिहिलाय.

या मेलनुसार, ‘दुसऱ्या टेस्टनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट झाली. या टेस्टनुसार श्रेयस खेळण्यासाठी फिट असून निवडीसाठी योग्य होता. त्याला दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर जावं लागेलं नाही.’

मोहम्मद शमीची दुखापत होण्यास BCCI जबाबदार? वाचा का होतोय बरा होण्यास उशीर

जय शहा कारवाई करणार?

श्रेयस अय्यरनं रणजी मॅच खेळावी लागू नये म्हणून मुंबईच्या मॅनेजमेंटनं दुखापतीचं कारण दिलं का? अथवा त्याला पुन्हा दुखापत झाल्याची माहिती त्यानं NCA ला दिली नाही? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

टीम इंडियाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील खेळाडूंना कोणतीही दुखापत झाल्यास त्याची माहिती NCA ला देणं बंधनकारक आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे.  

बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनी नुकताच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आणि इंडिया ए च्या खेळाडूंना गंभीर इशारा दिला होती. टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी या दोन्ही गटातील सर्व खेळाडूंना देशांतर्गत रेड बॉल क्रिकेट खेळणं बंधनकारक असल्याचं सांगितलं होतं.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

देशांतर्गत क्रिकेटच्या ऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याचा ट्रेन्ड अयोग्य आहे. कुणी असं वागलं तर त्या खेळाडूवर कठोर कारवाई होईल, असा इशारा शहा यांनी दिला आहे. त्यामुळे आता जय शहा या प्रकरणात काय कारवाई करणार? हे पाहावं लागेल.  

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading