ग्लेन मॅक्सवेलला यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रिटेन केले आहे. त्याच्या या सेंच्युरीवर आरसीबीच्या माजी खेळाडूनेच पाणी (Maxwell century in vain) ओतले.
ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत ओव्हर्सचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रेनगेड्सचा हा स्पर्धेतील सलग सहावा पराभव आहे. त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत फक्त 1 मॅच जिंकली असून ते सध्या सर्वात तळाला आहेत.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) 28 बॉल्समधील धडाकेबाज हाफ सेंच्युरी मेलबर्न स्टार्सला (Melbourne Stars) विजय मिळवून देण्यात कमी पडली.
ब्रिस्बेन हिट (Brisbane Heats) विरुद्ध अॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) या स्पर्धेच्या 13 व्या मॅचमध्ये ब्रिस्बेनच्या टॉम कुपरचा (Tom Cooper) अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे ‘बळी’ गेला. त्यामुळे या स्पर्धेत DRS नसण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) मध्ये एक स्फोटक खेळी पाहयला मिळाली. सिडनी सिक्सर्सच्या (Sydney Sixers) डॅन ख्रिस्टियनने (Dan Christian) फक्त 15 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिजसाठी निवड न झाल्याचा राग शॉन मार्शनं (Shaun Marsh) काढाला. त्याच्या हाफ सेंच्युरीमुळे मेलबर्न रेनगेड्सनं (Melbourne Renegades) पहिली मॅच जिंकली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजमधला ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चा फॉर्म बिग बॅश लीग (Big Bash League) मध्ये देखील कायम आहे. मॅक्सवेलची कॅप्टन्स इनिंग आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॉलर नॅथन कुल्टर नाईल (Nathan Colter-Nile) चा भेदक मारा यामुळे मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) ने पहिली मॅच 6 विकेट्सनं आरामात जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियातील (Australia) देशांतर्गत T20 लीग स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) ला सुरुवात झालीय. पहिल्या मॅचमध्ये होबार्ट हुरिकेन्सनं (Hobart Hurricanes) ने गतविजेत्या सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) चा 16 रन्सनं पराभव केला. टिम डेव्हिड (Tim David) ची आक्रमक हाफ सेंच्युरी आणि अनुभवी जेम्स फॉकनर (James Faulkner) ची कंजूष बॉलिंग हे होबार्टच्या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.
ऑस्ट्रेलियातील आयपीएल (IPL) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) यंदा नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. बिग बॅश लीग स्पर्धा (BBL 2020-21) 10 डिसेंबरपासून सुरु होणार असून या स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. खेळातील रंजकता वाढवण्यासाठी या नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाची देशांतर्गत T20 स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीगला (Big Bash League) 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सहा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आठ टीम सहभागी होणार आहेत.