फोटो – BCCI/IPL

महिला आयपीएल स्पर्धा आता काही दिवसांवर आलीय. तर त्यानंतर होणाऱ्या पुरुषांच्या आयपीएलची तयारीही सुरु झालीय. यंदा 22 मार्चपासून आयपीएलचा सिझन सुरु होणार आहे.

जगातील सर्वात प्रतिष्ठेची T20 लीग खेळण्याची सर्वच दिग्गज खेळाडूंची इच्छा असते. आयपीएलच्या 10 टीममध्येही स्पर्धा तीव्र असल्यानं कोणत्या चार टीम क्वालिफाय करणार याचा फैसला अनेकदा शेवटच्या आठवड्यात झालेला आहे.

धोनीचं वाढलं टेन्शन

विद्यमान आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सनंही या स्पर्धेची तयारी सुरू केलीय. सीएसकेचा ‘ऑल टाईम ग्रेट’ कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यंदाची स्पर्धाही खेळणार असल्यानं फॅन्सचा उत्साह वाढलाय.

सीएसकेचे फॅन्स जोशात असले तरी धोनीचं टेन्शन वाढलंय. सीएसकेचा मुंबईकर ऑल राऊंडर शिवम दुबे जखमी झालाय. या दुखापतीमुळे तो रणजी स्पर्धेतून बाहेर पडलाय. मुंबईनं रणजी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.

‘सेंच्युरी केल्यानंतरही मला का वगळलं?’, टीम इंडियाच्या खेळाडूचा धोनीला थेट प्रश्न

शिवम दुबेला दुखापतींवरील उपाचारानंतर फिट होण्यासाठी बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत जावं लागेल. त्याला दुखापतीमधून बरा होण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

आयपीएल स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार असल्यानं तो सुरुवातीचे सामने न खेळण्याची शक्यता आहे. तसं झालं तर तो सीएसकेसाठी मोठा धक्का असेल. सीएसकेच्या मॅनेजमेंटनं या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिवम दुबे महत्त्वाचा का?

भारतीय T20 टीममध्ये हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणूनही शिवम दुबेकडं पाहिलं जातंय. गेल्या आयपीएल सिझनमध्ये सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यात शिवमचा मोठा वाटा होता.

शिवमनं 16 मॅचमध्ये 158.33 च्या स्ट्राईक रेटनं 418 रन्स केले होते. यामध्ये 3 हाफ सेंच्युरीचा समावेश होता. सामन्यातील मधल्या ओव्हर्समध्ये (7 ते 14) स्पिनर्सविरुद्ध फटकेबाजी करण्याचं कौशल्य शिवमकडं आहे. त्यामुळे सीएसकेसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

अफगाणिस्ताविरुद्ध जानेवारी महिन्यात झालेल्या T20 सीरिजमध्ये शिवमनं 3 मॅचमध्ये सर्वाधिक 124 रन्स केले होते. तसंच 2 विकेट्स घेतल्या होत्या. रणजी स्पर्धेतही त्याचा फॉर्म कायम होता.

हार्दिक पांड्या फिट नसेल तर… टीम मॅनेजमेंटला सापडलं उत्तर

मुंबईलाही धक्का

शिवमनं यंदाच्या रणजी सिझनमधील 5 मॅचमध्ये 67.83 च्या सरासरीनं 407 रन्स केले आहेत. त्यामध्ये 2 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याचबरोबर 12 विकेट्सही घेतल्या आहेत.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

मुंबईची रणजी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये बडोदाविरुद्ध लढत होणार आहे. 23 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या मॅचमध्ये त्यांना फॉर्मात असलेल्या शिवमची कमतरता जाणवेल.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading