वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात 28 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेलाय. या दिवशी ब्रिस्बेनमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. तब्बल 27 वर्षांनी वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच जिंकलीय.

वेस्ट इंडिजला मागील T20 आणि वन-डे वर्ल्ड कपसाठी पात्र होता आलेलं नव्हतं. जगभर T20 लीग त्यांचे प्रमुख खेळाडू टेस्ट मॅच खेळत नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्यांचा अगदी नवोदीत संघ गेलाय. या टीमनं वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पराभूत केलं. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. हे या विजयानंतर त्यांच्या दिग्गज खेळाडूंची झालेली अवस्था पाहून समजते.

लाराच्या डोळ्यात पाणी

शामर जोसेफनं हेजलवूडची दांडी उडवर वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा कॉमेंट्री करत होता. 1997 साली ऑस्ट्रेलियाला टेस्टमध्ये हरवणाऱ्या टीमचा तो सदस्य होता.

‘त्या’ 2 शब्दांनी टीम पेटून उठली, वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं सांगितलं रहस्य, Video

लारानं जगभरातील बॉलर्सना बॅटनं वारंवार पाणी पाजणाऱ्या ब्रायन लाराचे डोळे त्यावेळी भरुन आले होते. त्यानं आनंदानं त्याच्याबरोबर कॉमेंट्री करणारा ऑस्ट्रेलियन विकेटकिपर अ‍ॅडम गिलख्रिस्टला मिठी मारली. त्यावेळी त्याचे डोळे गच्च भरले होते.

‘हे अविश्वसनीय आहे. 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केलंय. तरुण, अनअनुभवी, सर्वांनी मोडित काढलेल्या टीमनं वेस्ट इंडिज क्रिकेटची मान उंचावलीय. आज वेस्ट इंडिज क्रिकेटमधील मोठा दिवस आहे,’ या शब्दात लारानं कॉमेंट्री करताना त्याची भावना व्यक्त केली.

हुपर रडला

ब्रायन लाराचा टीममधील सहकारी कार्ल हुपरची अवस्थाही वेगळी नव्हती. हुपर सध्या वेस्ट इंडिज टीमचा असिस्टंट कोच आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा विजय आणखी स्पेशल आहे. या विजयानंतर इमोशनल झालेला हुपर एका रुममध्ये रडत होता.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

तब्बल 31 वर्षांनी वेस्ट इंडिजची टीम ऑस्ट्रेलियातून टेस्ट सीरिज न गमावता परत येणार आहे. कार्ल हुपरच्या शिष्यांनी हा चमत्कार करुन दाखवलाय.

वर्ल्ड चॅम्पियननं डोकं बडवलं

वेस्ट इंडिजनं डॅरेन सॅमीच्या नेतृत्त्वाखाली दोन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकला. सॅमी टेस्ट क्रिकेट फार खेळला नाही. पण, त्याला या विजयाचं महत्त्व चांगलंच माहिती आहे. सॅमी त्याच्या रुममध्ये लॅपटॉपवर ही मॅच पाहात होता.

वेस्ट इंडिजनं मॅच जिंकताच सॅमीला भावना नियंत्रित ठेवणं अशक्य झालं. तो आनंदानं ओरडू लागला. यावेळी त्याचं डोकं लॅपटॉपवर बडवलं पण, सॅमीला त्याची पर्वा नव्हती. कारण, ती सॅमीसाठीच नाही तर संपूर्ण वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी सेलिब्रेशन करण्याची वेळ होती.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading