फोटो – ट्विटर, बीसीसीआय

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे सीरिज (India vs West Indies ODI Series 2022) रविवारी (6 फेब्रुवारी 2022) सुरू होत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यानंतर पहिल्यांदाच वन-डेमध्ये खेळणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. रोहितनं पहिल्या वन-डेपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. यावेळी रोहित शर्मानं एका प्रश्नाला (Rohit Sharma on Youngsters) मिस्कील उत्तर देत, ‘मला (रोहित) आणि धवनला बाहेर बसवा’ असं सांगितलं.

नेमकं काय घडलं?

टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माला यावेळी वेगवेगळी प्रश्नं विचारण्यात आली. पहिल्या तीन क्रमांकात तरूण बॅटर्सना संधी दिली पाहिजे का? असा प्रश्न यावेळी रोहितला विचारण्यात आला. त्यावेळी रोहितनं या प्रश्नाच्या उत्तरात त्याने थेट सिक्सर लगावला.

‘इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना ओपनर करावं. मला आणि शिखर धवनला बाहेर बसवावं,’ असं तुम्हाला वाटतं का?’ असं मजेशीर उत्तर रोहितनं यावेळी दिलं. हे उत्तर देताच तो हसू लागला. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाही हसू आवरले नाही. तरूण क्रिकेटपटूंनाही संधी मिळेल, असे रोहित (Rohit Sharma on Youngsters) त्यानंतर म्हणाला.

कोण करणार ओपनिंग?

पहिल्या वन-डेमध्ये रोहित शर्मासोबत इशान किशन (Ishan Kishan) ओपनिंग करणार आहे. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोना झाला आहे. तसेच केएल राहुल वैयक्तिक कारणामुळे पहिल्या वन-डेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे T20 टीमचा सदस्य असलेल्या इशान किशनची वन-डे टीममध्ये निवड करण्यात आली होती. तो पहिल्या मॅचमध्ये ओपनिंगला येईल असे त्याने जाहीर केले आहे.

टीम इंडियातील शिखर आणि ऋतुराजसह श्रेयस अय्यरला कोरोनाची लागण झालेली आहे. हे सर्वजण आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. पण, त्यांची वन-डे सीरिजमधील उपलब्धता अनिश्चित आहे, असे रोहितने यावेळी सांगितले.

Unlucky Shreyas Iyer: वर्षभरात वारंवार बसला श्रेयसला फटका, 4 घटनांमुळे ठरला सर्वात दुर्दैवी!

कोरोनामुळे संतुलन बिघडले

कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे टीमचे संतुलनही बिघडले असल्याची कबुली रोहितनं यावेळी दिली. खेळाडूंनी आपली जागा सोडून अन्य भूमिकेत खेळण्याची तयारी ठेवावी अशी सूचना त्याने यावेळी केली. ‘सध्याची परिस्थिती अवघड आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी अनिश्चित आहेत. असं काही झालं तर बरं होण्यासाठी लागणारा कालावधी हा वेगवेगळा आहे.प्रत्येक खेळाडू वेगळा असल्यानं कुणी आठवडाभरात बरं होतं तर कुणाला दोन आठवडे लागतात.

टीमला या सर्व गोष्टींची जाणीव आहे. संधी कधीही मिळू शकते. त्यासाठी तयार राहयला हवं, हे आम्ही सर्वांना सांगितलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या जागेवर आपली निवड झाली आहे, त्या जागेवर खेळण्याची तयारी हवी,’ असेही रोहितने (Rohit Sharma on Youngsters) यावेळी स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading