फोटो – बीसीसीआय, आयपीएल

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टीफन फ्लेमिंग हे दोन जण ही टीम चालवतात. हाय प्रोफाईल खेळाडूंच्या मागे न लागता चेन्नईच्या टीम कल्चरला योग्य खेळाडूंची निवड धोनी-फ्लेमिंग जोडी करते. कॅप्टन धोनीचे हे (बहुधा) शेवटचे आयपीएल आहे. त्यामुळे या मेगा ऑक्शनमध्ये भविष्यातील टीम बांधणीवर सीएसकेचा भर (IPL 2022 CSK Probable) असेल.

कोण असेल ओपनर?

चेन्नईनं ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) रिटेन केले आहे. ऋतुराज मागील सिझनमधील ऑरेंज कॅप विजेता होता. त्याचा फॉर्म पाहता तो रिटेन होणार हे स्वाभाविक होते. ऋतुराजसोबत चेन्नई पुन्हा एकदा फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) खरेदी करण्यासाठी सर्वाधिक भर देईल. फाफ हा चेन्नईचा विश्वासू खेळाडू आहे. त्याने मागच्या सिझनमध्ये ऋतुराजपेक्षा फक्त 2 रन कमी केले होते. ऋतुराज आणि फाफ ही चेन्नईची जोडी नंबर 1 आगामी सिझनमध्येही खेळवण्याचा मॅनेजमेंटचा प्रयत्न असेल.

फाफ ड्यू प्लेसिस ऑक्शनमध्ये बजेटच्या बाहेर गेला तर टीम इंडियाचा अनुभवी ओपनर शिखर धवनला धोनी पसंती देऊ शकतो. न्यूझीलंडचा डेव्हान कॉनवे सध्या फॉर्मात आहे. लाईमलाईटमध्ये फार नसलेला हा ओपनर देखील सीएसके ऑक्शनमध्ये निवडण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोवरही सीएसकेचे लक्ष असेल. त्याचबरोबर नारायण जगदीशनलाही पुन्हा एकदा सीएसके खरेदी करण्याची शक्यता (IPL 2022 CSK Probable) आहे.

संभाव्य ओपनर : फाफ ड्यू प्लेसिस, शिखर धवन, डेव्हान कॉनवे, जॉनी बेअरस्टो, नारायण जगदीशन

IPL 2022 Mega Auction: मुंबई इंडियन्स कुणाची निवड करणार? अशी असेल मुंबईची संभाव्य टीम

मिडल ऑर्डरमध्ये कोण?

चेन्नई सुपर किंग्सनं मिडल ऑर्डरमध्ये मोईन अली आणि रवींद्र जडेजा यांना रिटेन केले आहे. आता मिडल ऑर्डरमध्ये ते अन्य कुणाला घेतात यावर या टीमची आगामी काळतील दिशा अवलंबून असेल. सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू या तीनपैकी दोन किंवा किमान रैना परत मिळवण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. रैना सध्या फॉर्मध्ये नाही. तसंच नियमित टचमध्येही नाही. तरीही सीएसके आणि रैनाचे असलेले इमोशनल नाते पाहाता त्याला सीएके खरेदी करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

सॅम करन यंदा आयपीएलमध्ये खेळणार नाही. तसंच ड्वेन ब्राव्हो शेवटच्या टप्प्यात आहे. या दोघांच्या जागेवर जेसन होल्डर आणि मिचेल मार्श हे दोन पर्याय सीएसकेकडे (IPL 2022 CSK Probable) आहेत. पण, हे दोघं विशेषत: होल्डर सीएसकेच्या बजेटमध्ये येणार का? हा खरा प्रश्न आहे.

सीएसके पर्याय म्हणून विजय हजारे ट्रॉफी गाजवणारा ऋषी धवन, इंग्लंडचा फॉर्मात असलेला विकेट किपर सॅम बिलिंग तसेच वेस्ट इंडिजचा ओडियन स्मिथ किंवा डोमॅनिक ड्रेक्स यांचा विचार करू शकते.

संभाव्य मिडल ऑर्डर :  सुरेश रैना, रॉबीन उथप्पा, अंबाती रायुडू, जेसन होल्डर, मिचेल मार्श, ऋषी धवन, सॅम बिलिंग, ओडियन स्मिथ आणि डोमॅनिक ड्रेक्स

IPL 2022 Mega Auction: RCB कुणाची निवड करणार? अशी असेल बंगळुरूची संभाव्य टीम

फास्ट बॉलर

शार्दूल ठाकूर, दीपक चहर लुंगी एन्गिडी आणि जोश हेजलवूड हे सीएसकोचे चारही फास्ट बॉलर ऑक्शनमध्ये आहेत. त्यामुळे हे चार विशेषत: दोन भारतीय बॉलर्स सीएसकेला परत मिळवण्यात यश मिळते का? हे पाहावं लागेल. जयदेव उनाडकतसाठी सीएसकेने यापूर्वी दोन-तीन ऑक्शनमध्ये बोली लावली आहे. ते यंदाही त्याला घेण्याचा प्रयत्न करतील. नॅथन कुल्टर नाईल आणि नटराजन हे देखील सीएकेच्या रडारवर असेल

संभाव्य फास्ट बॉलर : शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एन्गिडी, जोश हेजलवूड, नॅथन कुल्टर नाईल आणि नटराजन

स्पिन बॉलर्स

रवींद्र जडेजा आणि मोईन अली हे Playing 11 मध्ये हमखास खेळतील असे स्पिनर सीएसकेकडे आहेत. आर. अश्विन पुन्हा सीएकेकडे येणार का ? हा मोठा प्रश्न आहे. अश्विनपेक्षा कुलदीप यादव यंदा सीएसकेच्या टीममध्ये येण्याची आणि धोनीच्या कॅप्टनसीमध्ये येण्याची मोठी शक्यता आहे. तामिळनाडूचा साई किशोर आणि लकी चार्म कर्ण शर्माला पुन्हा एकदा टीमध्ये घेण्यासाठी सीएसके बोली लावेल. त्याचरोबर मिचेल सॅटनर देखील सीएसकेला पुन्हा हवा (IPL 2022 CSK Probable) असेल.

संभाव्य स्पिनर्स : आर. अश्विन, कुलदीप यादव, साई किशोर, कर्ण शर्मा आणि मिचेल सँटनर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading