फोटो – X

आयपीएल 2024 सुरु होण्यास अजून एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आहे. त्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू हेनरिच क्लासेन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेली T20 लीग आता अंतिम टप्प्यात आहे. या लीगच्या दुसऱ्या क्वालिफारमध्ये डरबन सुपर जायंट्सनं जोहान्सबर्ग सुपर किंग्सचा 69 रन्सनं मोठा पराभव केला. डबरनच्या या विजयात क्लासेनच्या वादळी खेळीचं मोठं योगदान होतं.

10 बॉलमध्ये 54 रन्स!

पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या डबरनची 13 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 95 अशी बिकट अवस्था झाली होती. त्यावेळी क्लासेननं आक्रमक बॅटिंग करत मॅचचं चित्रच बदललं. त्यानं 30 बॉलमध्ये 246.66 च्या स्ट्राईक रेटनं 74 रन्स केले.

क्लासनेननं या खेळीत 3 फोर आणि 7 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्यानं 74 पैकी 54 रन्स हे फक्त 10 बॉलमध्ये केले. यापूर्वीच्या मॅचमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या सॅम कूकला त्यानं विशेष लक्ष्य केलं. त्यानं टाकलेल्या 18 व्या ओव्हरमध्ये 3 सलग सिक्सर लगावले. त्याचबरोबर अनुभवी इम्रान ताहीरचीही त्यानं चांगलीच धुलाई केली.

क्लासेनच्या या फटकेबाजीमुळे डरबननं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 211 असा भक्कम स्कोर उभा केला. त्याला उत्तर देताना सुपर किंग्सची संपूर्ण टीम 17.4 ओव्हर्समध्ये 142 रन्सवरच ऑल आऊट झाली.

मॅच फिरवणारा क्लासेन

कमी बॉलमध्ये मॅच फिरवण्याची क्षमता असलेल्या आघाडीच्या खेळाडूंमध्ये सध्या क्लासेनचा समावेश होतोय. मीडल ओव्हर्समध्ये विशेषत:  स्पिनर्सविरुद्ध तर तो अधिक आक्रमक खेळतो. डरबनच्या फायनलपर्यंच्या वाटचालीतही त्याचं महत्त्वाचं योगदान आहे.

क्लासेननं यंदाच्या सिझनमध्ये आत्तापर्यंत 12 मॅचमध्ये 44.70 च्या सरासरीनं 447 रन्स केलेत.. क्लासेननं या सिझनमध्ये डरबनकडून सर्वात जास्त रन्स केले असून सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

SA20 : इटलीच्या खेळाडूचा आफ्रिकेत धमाका, सुपर किंग्सची ‘प्ले ऑफ’मध्ये धडक

विशेष म्हणजे क्लासेननं 208.87 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केलीय. सर्वाधिक रन्स करणाऱ्या टॉप 10 बॅटर्सच्या यादीत एकाचीही सरासरी 200 पेक्षा जास्त नाही. त्याचबरोबर क्लासेननं 4 हाफ सेंच्युरीही झळकावत आपण मोठा स्कोअरही करु शकतो हे दाखवून दिलंय.

वर्षभरापासून फॉर्मात

हेनरिक क्लासेन काही आत्ताच फॉर्ममध्ये आलेला नाही. गेल्या वर्षभरापासून तो मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं रन्स करतोय. वर्ल्ड कपपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मध्ये 114 बॉलमध्ये 174 रन्स केले होते.

भारतामध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये त्यानं 49.77 च्या सरासरीनं 448 रन्स केले होते. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरींचा समावेश होता. क्लासेननं वर्ल्ड कपमधील फॉर्म आफ्रिकन लीगमध्येही कायम ठेवलाय.

आयपीएलमध्येही दमदार

आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्सची कामगिरी निराशाजनक झाली. या खराब कामगिरीतही क्लासेननं दमदार खेळ केला होता. त्यानं मागील आयपीएलमधील 12 मॅचमध्ये 49.77 ची सरासरी आणि 177.07 च्या स्ट्राईक रेटनं 448 रन्स केले होते.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

क्लासेननं आरसीबीविरुद्ध 51 बॉलमध्ये 104 रन्सची केलेली खेळी सर्वांच्याच लक्षात आहे. या सिझनमध्येही तो अधिक दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading