फोटो – X

भारतानं बेंगळुरुमध्ये झालेल्या थरारक T20 मॅचमध्ये अफगाणिस्तानचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मॅचमध्ये दोन सुपर ओव्हर्स झाल्या. रोहित शर्माची दमदार बॅटिंग हे या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरली. त्याचबरोबर रोहित या मॅचमध्ये दोन्ही सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला कसा आला? हा प्रश्नही आता विचारला जातोय. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सुपर ओव्हरमध्ये काय झालं?

निर्धारित 20 ओव्हर्सच्या मॅचमध्ये दोन्ही टीमचा स्कोअर बरोबरीत होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करत 16 रन केले. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी मैदानात उतरली.

आवडत्या मैदानात तळपली रोहितची बॅट, केला कुणालाही न जमलेला रेकॉर्ड

पहिल्या दोन बॉलवर फक्त दोन रन निघाले. त्यानंतरच्या दोन बॉलवर रोहितनं दोन सिक्स लगावले. पाचव्या बॉलला एक रन काढली. भारताला विजयासाठी 2 रन हवे असताना रोहित पॅव्हिलियनमध्ये परतला. रिंकू सिंह नॉन स्ट्रयकरला आला. शेवटच्या बॉलवर फक्त एकच रन निघाल्यानं पहिली सुपर ओव्हरही टाय झाली.

Retired Out की Retired Hurt?

रोहित शर्मानं पहिल्या सुपर ओव्हर्सच्या पाचव्या बॉलवर मैदान सोडलं. त्यावेळी रोहित रिटायर्ड आऊट झाला असा अनेकांचा समज झाला. तो रिटायर्ड आऊट असता तर त्याला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळता आलं नसतं.

आयसीसीच्या नियमानुसार इंटरनॅशनल T20 क्रिकेटमध्ये पहिल्या सुपर ओव्हरमध्ये आऊट झालेल्या बॅटरला लगेच दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करता येत नाही. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नॉट आऊट राहिलेला तसंच ज्याला बॅटिंग मिळाली नाही असा खेळाडू दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करू शकतो.

कुछ तो गडबड है… मुंबई इंडियन्सच्या पोस्टरवरुन रोहित शर्मा गायब!

रोहित शर्मा सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला याचा एकच अर्थ आहे त्याला अंपायरनं रिटायर्ड आऊट नाही तर रिटायर्ड हर्ट घोषित केले होते.

नियम काय सांगतो?

MCC च्या नियमानुसार एखादा बॅटर खेळताना जखमी झाला, आजारी पडला किंवा काही न टाळता येणाऱ्या प्रसंगामुळे रिटायर्ड हर्ट झाला तर त्याला पुन्हा एकदा इनिंगमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळू शकते. संबंधित बॅटरला त्या इनिंगमध्ये पुन्हा बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही तर त्याला ‘रिटायर्ड नॉट आऊट’ जाहीर केले जाते.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

रोहित शर्माच्या बाबतीत ही परिस्थिती नव्हती. त्यामुळे MCC च्या याच नियमातील पुढील तरतुदीनुसार, ‘एखाद्या बॅटरनं काही कारणामुळे इनिंग अर्धवट सोडली असेल तर प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनच्या परवानगीनं त्याला पुन्हा एकदा बॅटिंग करता येऊ शकते.’

त्याचबरोबर टीममधील एखादा बॅटर आऊट झाल्यानंतरही काही कारणामुळे रिटायर्ड हर्ट झालेल्या खेळाडूला पुन्हा एकदा बॅटिंग करता येते. या मॅचमध्ये एक सुपर ओव्हर संपून दुसरी सुपर ओव्हर सुरू होणार होती. त्यामुळे अफगाणिस्तानच्या कॅप्टननं परवानगी दिल्याशिवाय रोहित शर्मा बॅटिंग करु शकणार नव्हता. रोहितला ती परवानगी मिळाली. त्यामुळेच त्यानं दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग केली.  

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading