फोटो – ट्विटर, दिल्ली कॅपिटल्स

आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या दशकात दिल्लीची टीम बहुतेक काळ तळामध्ये होती. गेल्या 3 वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)  टीमचा हेड कोच झाल्यानंतर दिल्लीच्या खेळात सातत्य आलं आहे. गेल्या 3 सिझनमध्ये ‘प्ले ऑफ’ गाठणारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ही एकमेव टीम आहे. त्यांना अजूनही विजेतेपद मिळाले नाही. त्यानंतरही आयपीएलमधील एक ‘पॉवर हॉऊस’ म्हणून दिल्ली कॅपिटल्सनं नाव कमावलं आहे. या मेगा ऑक्शननंतर दिल्लीनं निवडलेली टीम अनेकांना आवडली. आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्लीसमोर अडचणींचा डोंगर (IPL 2022 DC Preview) उभा आहे.

रिटेन केले 4, सुटले अनेक

दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल रिटेन्शन नियमानुसार कमाल 4 खेळाडूंना रिटेन केले. ऋषभ पंत (Rishbah Pant) कॅप्टन म्हणून कायम राहणार हे ठरल्यानं श्रेयस अय्यर बाहेर पडला. अनुभवी शिखर धवनच्या जागी त्यांनी तरूण आक्रमक पृथ्वी शॉ ला पसंती दिली. अनुभवी अश्विनला न निवडता अक्षरची निवड केली. तर रबाडाच्या जागी नॉर्कियाला कायम ठेवलं. हेटमायर आणि स्टॉईनिस हे तर दिल्लीच्या संभाव्य रिटेन्शन यादीत कुठेच नव्हते.

या सर्व खेळाडूंमुळे दिल्ली कॅपिटल्सनं मागील 3 वर्षांमध्ये सातत्य कायम ठेवलं होतं. चेन्नई सुपर किंग्सनं बहुतेक जुने खेळाडू परत मिळवले. मुंबईनं इशान किशनसाठी पर्स रिकामी केली. आरसीबीनंही हर्षल आणि हसरंगला पुन्हा खरेदी केलं. दिल्लीला त्यांनी सोडलेला एकही प्रमुख खेळाडू पुन्हा मिळाला (IPL 2022 DC Preview) नाही.

IPL 2022 : धोनीचा विश्वासू पॉन्टिंगच्या कॅम्पमध्ये दाखल, दिल्लीला सापडणार विजयाची किल्ली!

स्पर्धेपूर्वी डोकेदुखी

प्रमुख जुने खेळाडू पुन्हा मिळाले नसले तरी दिल्ली कॅपिटल्सनं चांगल्या खेळाडूंची खरेदी केली आहे. या खरेदीनंतरही सुरूवातीच्या मॅचमध्ये प्रमुख खेळाडू उपलब्ध नसल्यानं दिल्लीसमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श हे पाकिस्तान सीरिजमुळे उपलब्ध नाहीत. मुस्तफिजूर रहमान दक्षिण आफ्रिकेत आहे. तर नॉर्किया दुखापतीमुळे पहिल्या काही मॅच खेळू शकणार नाही. त्यामुळे 7 पैकी फक्त 3 विदेशी खेळाडू दिल्लीचे सुरूवातीला उपलब्ध आहेत.

आयपीएलमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता प्रत्येक मॅच ही महत्त्वाची आहे. त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत दिल्लीचे सर्व खेळाडू उपलब्ध नसणे ही पॉन्टिंगसाठी मोठी डोकेदुखी (IPL 2022 DC Preview) आहे. टीमला लय सापडण्यात याचा अडथळा येऊ शकतो.

दिल्लीची बॅटींग

टीम इंडियाच्या रडारापासून सध्या दूर असलेल्या पृथ्वी शॉसाठी (Prithvi Shaw) ही आयपीएल स्पर्धा मोठी संधी आहे. पृथ्वीला यंदा डेव्हिड वॉर्नर हा धवनपेक्षा अधिक अनुभवी आणि आक्रमक ओपनिंग पार्टनर आहे. पृथ्वीला रिटेन करून दिल्लीनं विश्वास दाखवला आहे. त्यातचं सर्व लीग मॅच या पृथ्वीच्या होम ग्राऊंडवरच होत असल्यानं पृथ्वीला 500 पेक्षा जास्त रन करण्याची मोठी संधी या आयपीएलमध्ये आहे. पृथ्वीनं ती संधी साधली तरच टीम इंडियाच्या संभाव्य यादीत त्याचे नाव आघाडीवर येईल.

दिल्लीची बहुतेक बॅटींग ही ऋषभ पंतच्या फॉर्मभोवती फिरणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतच्या बॅटींगमध्ये मोठा बदल झालाय. टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. पंतची बॅटींग आणि कॅप्टनसी याकडे सर्वांचं लक्ष (IPL 2022 DC Preview) असेल.

मिचेल मार्श सध्या T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फॉर्मात आहे. तर रोव्हन पॉवेलनं गेल्या काही महिन्यात आक्रमक बॅटींगनं लक्ष वेधून घेतलंय. पाकिस्तान सीरिजनंतर मार्शचा फिटनेस किती राहतो हा मोठा मुद्दा आहे. मार्श बऱ्याच काळानंतर तर पॉवेल पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळतोय. त्यामुळे दिल्लीच्या बॅटींगचा विषय हा पंतवर येऊन थांबतो.

दिल्लीची बॉलिंग

नॉर्किया, रबाडा आणि आवेश खान हे दिल्ली कॅपिटल्सच्या फास्ट बॉलिंगचे त्रिकूट यंदा एकत्र नाही. नॉर्किया पूर्ण फिट झाल्यानंतरही मुंबईतील उकाडा आणि पिचवर त्याची परीक्षा असेल. तसंच त्याला यंदा साथ द्यायला रबाडा सारखा अनुभवी बॉलर नाही. त्याच्या जागेवर लुंगी एन्गिडी आणि मुस्तफिजूर रहमान हे पर्याय दिल्लीकडे आहेत. तसंच सध्या फॉर्मात असलेल्या शार्दुल ठाकुरकडून दिल्लीला बॉलिंग आणि डेथ ओव्हर्समधील बॅटींग या दोन्ही विभागात मोठी अपेक्षा आहे.

दिल्लीच्या स्पिन बॉलिंगची जबाबदारी आता अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. कुलदीप यादवला अजूनही फॉर्म सापड़लेला नाही. अश्विन आणि अमित मिश्राचे बॅक अप नसल्यानं अक्षरला प्रमुख स्पिनर्सची भूमिका पार पाडावी लागेल. कुलदीपचा फॉर्म हरपल्यास प्रवीण दुबे आणि ललित यादव हे बॅक अप स्पिनर्स दिल्लीकडे (IPL 2022 DC Preview) आहेत.

तरूणांना संधी

अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या (Under 19 World Cup 2022) टीमचा कॅप्टन यश ढूल दिल्लीच्या टीममध्ये आहे. यशनं रणजी स्पर्धेतही त्याचा फॉर्म कायम ठेवलाय. यश हा दिल्लीची दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकतो. अंडर 19 वर्ल्ड कप टीममधील सर्वात यशस्वी भारतीय स्पिनर विकी ओस्तवाल देखील दिल्लीनं खरेदी केला आहे. लोणावळ्याच्या विकीला मुंबई आणि पुण्याच्या पिचवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तो अनुभव दिल्लीसाठी फायद्याचा ठरू शकतो.

Mumbai Indians Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची मुंबई इंडियन्स? काय खास, काय डेंजर?

केएस भरत, सर्फराज खान, मनदिप सिंह, कमलेश नागरकोटी, खलील अहमद या भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेबाबत कुणालाही शंका नाही. यापैकी भरतचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना गेला सिझन बरा ठरला नव्हता. त्यांनाही दिल्लीच्या टीममध्ये मोठी संधी (IPL 2022 DC Preview) आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा हे खेळाडू कसा फायदा घेतात त्यावर बरंच काही अवलंबून आहे.

दिल्ली कॅपिटल्सची संपूर्ण टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, केएस भरत, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, चेतन सकारिया, नॉर्किया, टीम सायफर्ट, सर्फराज खान, यश ढूल, मनदिप सिंह, ललित यादव,  प्रवीण दुबे,  लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, खलील अहमद,  कमलेश नागरकोटी, रिपल पटेल आणि यश ओस्तवाल.

पहिल्या मॅचसाठी संभाव्य Playing 11 : पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, मनदीप सिंह, ऋषभ पंत, सर्फराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी आणि चेतन सकारिया

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading