फोटो – ट्विटर

राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) आयपीएलमधील यशामध्ये संजू सॅमसनचा (Sanju Samson) मोठा वाटा आहे. संजूची वयाच्या 18 व्या वर्षी राजस्थानच्या टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर आता गेल्या 10 वर्षांपैकी 2 वर्षांचा काळ सोडला तर तो राजस्थानकडंच आहे. आता संजू राजस्थानचा कॅप्टन असून त्यानं कोणत्याही कसोटीच्या प्रसंगी शांतपणे टीम हातळलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. संजू सॅमसनच्या जडणघडणीत राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मोठा वाटा आहे. संजूनं एका मुलाखतीमध्ये द्रविडनं दिलेल्या शिक्षणाच्या आठवणी सांगितल्या (Sanju Samson on Dravid) आहेत.

द्रविडची प्रत्येक गोष्ट…

संजू राजस्थान रॉयल्सकडून खेळाडू म्हणून द्रविडसोबत खेळला. आपण आयपीएलमध्ये पदार्पण केले त्यावेळी आपल्यासोबत द्रविड बॅटींग करत होता, अशी आठवण संजूनं ‘ब्रेक फास्ट विथ चॅम्पियन’ या कार्यक्रमात बोलताना सांगितली आहे.

‘मी ट्रायलसाठी केलेली दोन दिवस बॅटींग हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास काळ होता. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात या प्रकारची बॅटींग केली नाही. मी प्रत्येक शॉट मारल्यानंतर ‘शॉट संजू..’ असा आवाज माझ्यासाठी येत असे. तो राहुल द्रविडचा आवाज होता. तो माझ्याठी खरंच अद्भूत क्षण होता, असं संजूनं सांगितलं.

राहुल द्रविडच्या शिष्याकडं निवड समितीचं दुर्लक्ष, चांगल्या कामगिरीनंतरही संधी नाही

संजू दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला तेव्हा द्रविड त्या टीमचा मेंटॉर होता. राजस्थान आणि दिल्ली या दोन टीममध्ये मिळून संजू एकूण 4 वर्ष द्रविडसोबत होता. त्या काळात मला द्रविडनं जे काही सांगितलं… माझ्या प्रश्नांची जी उत्तरं द्रविडनं दिली… तो द्रविडचा प्रत्येक शब्द मी रूममध्ये येऊन वहीमध्ये लिहून ठेवत असे. माझ्याकडे आजही त्या वह्या आहेत, असं संजूनं यावेळी (Sanju Samson on Dravid) सांगितलं.

राहुल द्रविडचा स्वभावा खूपच वेगळा आहे. मी त्यांच्यासोबत राजस्थान रॉयल्ससोबत खेळलोय. टीमचे मालक असो किंवा ग्राऊंडसमन प्रत्येकाला ते समान वागणूक देत असे. ते माझ्या लग्नाला उपस्थित होते, हा माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यातील मोठा क्षण होता,’ असंही संजू  म्हणाला.

द्रविडनं सांगितलं होतं भविष्य

2016 आणि 17 या काळात संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य होता. त्यावेळी द्रविड टीमचा मेंटॉर होता. त्या टीममध्ये संजूसह करूण नायर, श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल आणि ऋषभ पंत हे तरूण खेळाडू होते. द्रविडनं आम्हा सगळ्यांना बोलावून तुम्ही टीम इंडियाकडून नक्की खेळणार असे सांगितले होते, हा किस्साही संजूनं (Sanju Samson on Dravid) सांगितला. द्रविडचं हे भविष्य खरं ठरलं आहे. हे सर्व खेळाडू त्यानंतरच्या काळात टीम इंडियाकडून खेळले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading