फोटो-ट्विटर

आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये 2022 (ICC Women’s World Cup 2022) बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी पाकिस्तान महिला टीमला पराभूत करून स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. सोमवारी खेळल्या गेलेल्या या महिला वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान (Bangladesh Women vs Pakistan Women) यांच्यात थरारक मॅच पाहायला मिळाली. शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बांगलादेशने 9 रन्सने विजय मिळवला. या पराभवासह पाकिस्तानसाठी सार्वधिक रन्स करणाऱ्या सिदरा अमीनची सेंचुरी व्यर्थ गेली.

या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करताना बांगलादेशने 234 रन्सचे मोठे आव्हान विरोधी टीम समोर ठेवले ज्यामध्ये फरगाना हकने शानदार खेळ दाखवत 71 रन्स केले. याशिवाय कर्णधार निगार सुलतानाने 46, शर्मीन अख्तरने 44 रन्स केले. बांगलादेशने 7 गाड्यांच्या मोबदल्यात 234 रन्स केले आणि पाकिस्तानला 235 रन्सचे मोठे लक्ष्य दिले.

पाकिस्तानच्या संघाने शानदार सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 91 रन्स केले. पाकिस्तानकडून सिदरा अमीनने सार्वधिक 104 रन्स केले, ज्यात 8 चौकारांचा समावेश होता. सलामीवीर नाहिदा खानने 43 आणि कर्णधार बिस्माह मारूफने 31 रन्स केले. या व्यतिरिक्त पाकिस्तानचा एकही बॅटर रन्स करू शकला नाही.

Women’s World Cup: पाकिस्तानी कॅप्टनचं लेकीसोबत सेलिब्रेशन, आई-मुलीच्या बॉन्डिंगचा पाहा गोड VIDEO

बांगलादेशकडून रुमाना अहमदने 2 आणि फहिमा खातूनने 3 विकेट घेतल्या. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे, अशा स्थितीत ते प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. बांगलादेशकडून मिळालेल्या या पराभवानंतर (Bangladesh Women vs Pakistan Women) पाकिस्तानचा संघ पॉईंट टेबलमध्ये तळाला पोहोचला आहे. महिला वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया संघ तीन विजयांसह नंबर एकवर आहे, तर भारतीय संघ दोन विजयांसह नंबर दोनवर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading