फोटो – ट्विटर

ऑस्ट्रेलियाची देशांतर्गत T20 स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीगला (Big Bash League) 10 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. सहा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आठ टीम सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या साखळी फेरीत शेवटची लढत 26 जानेवारीला होणार असून सहा फेब्रुवारीला फायनल होणार आहे. चायनीज व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या राज्यांमधील परिस्थिती लक्षात घेऊन हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

बिग बॅश स्पर्धेतली पहिली मॅच ही गतविजेता सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हुरिकेन्स (Sydney Sixers vs Hobart Hurricanes) या टीममध्ये 10 डिसेंबर रोजी होबार्टमध्ये (Hobart) खेळली गेली. स्पर्धेतली सुरुवातीच्या लढती होबार्ट आणि कॅनबेरामध्ये होतील. क्वीन्सलँड राज्याची राजधानी ब्रिस्बेनमध्ये 23 डिसेंबरला पहिली मॅच होईल. तर 28 डिसेंबरला दक्षिण ऑस्ट्रेलियातील ॲडलेडमध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (C.A.) ने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये जानेवारी महिन्यात पाच मॅचेस होणार आहेत. यामध्ये पर्थ स्कॉचर्सच्या चार होम मॅचेसचा समावेश आहे. सिडनी आणि मेलबर्नमधील मॅचेसना 13 जानेवारीपासून सुरुवात होईल. सिडनीमध्ये आठ तर मेलबर्नमध्ये 11 मॅचेस होणार आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.



error: