फोटो – BCCI

भारत वि. इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या वन-डे मध्ये भारताचा 6 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवातही के.एल. राहुल (KL Rahul) याला गवसलेला फॉर्म ही टीम इंडियासाठी दिलासादायक गोष्ट होती. T20 सीरिजमध्ये खराब फॉर्मममध्ये असलेल्या राहुलनं वन-डे क्रिकेटमधील 5 वी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीनंतर राहुलनं दोन्ही कानात बोटं घालून अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. राहुलनं स्वत: या अनोख्या सेलिब्रेशनचं (Rahul on celebration) कारण सांगितलं आहे.

राहुलने सावरली इनिंग

पुण्यातील दुसऱ्या वन-डे मध्ये राहुल बॅटींगला आला तेंव्हा टीम इंडियाची अवस्था ही 2 आऊट 37 अशी होती. पहिल्या 10 ओव्हरचा पॉवर प्ले संपण्यापूर्वीच टीम इंडियाने दोन्ही ओपनर गमावले होते. त्यावेळी आणखी एक विकेट गेली असती तर भारताची अवस्था आणखी बिकट होणार होती. त्यावेळी राहुलने कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सोबत टीम इंडियाची इनिंग सावरली.

राहुल-विराट जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 121 रनची पार्टरनरशिप केली. विराटची बहुप्रतीक्षीत सेंच्युरीच्या दिशेनं सहज वाटचाल सुरु होती. त्यावेळी अचानक विराट 66 रनवर आऊट झाला. पण विराट आऊट होण्यापूर्वी राहुल सेट झाला होता.

राहुलनं या मालिकेतील पहिल्या वन-डेमध्ये नाबाद 62 रन काढले होते. त्यानं दुसऱ्या वन-डेमध्ये त्याच्याच पुढे खेळ केला. राहुलने 66 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकाली. यामध्ये फक्त 3 फोरचा समावेश होता. हाफ सेंच्युरीनंतर त्याने हात आणखी मोकळे केले. 108 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं त्यानं सेंच्युरी पूर्ण केली.

( वाचा : Explained: 4 मॅचमध्ये 1 रन काढल्यानंतरही केएल राहुल टीम इंडियामध्ये का हवा? )

…त्या कृतीचं कारण काय?

राहुलनं सेंच्युरी होताच ड्रेसिंग रुमच्या दिशेनं बॅट दाखवली आणि दोन्ही कानात बोटं घालून कान बंद केल्याची कृती केली. राहुलनं मॅच संपल्यानंतर याचे कारण सांगितले आहे.

‘ती फक्त गोंधळ कमी करण्याची कृती होती. यामधून कुणाचाही अनादर करणे हा हेतू नव्हता. काही जण सतत तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. T20 सीरिजनंतर मी खूप निराश होतो. पण, खेळ हा असाच पुढे सरकतो. चांगल्या शॉट्सनंतर दबाव कमी होतो. विराट आणि पंतसोबत चांगली पार्टरनरशिप करता आली याचे समाधान आहे,’ असे राहुलने या सेलिब्रेशनबद्दल (Rahul on celebration) सांगितले.

( वाचा : पहिल्याच मॅचमध्ये ‘सूर्य’ कुमार तळपला, टीम इंडियाची ‘प्रकाश’मान कामगिरी )

राहुलची विराट कोहली नंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) सोबत चांगली पार्टरनरशिप केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 80 बॉलमध्ये 113 रन जोडले. या आक्रमक पार्टरनरशिपमुळेच टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 6 आऊट 336 पर्यंत मजल मारता आली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: