फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियानं घेतलेल्या एका निर्णयाची सध्या चर्चा सुरू आहे. या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) आधी पाचव्या नंबरवर बॅटींगला पाठवण्यात आले. यामध्ये काही जणांना लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन दिसले. काहींना तेव्हा बॉलिंग ऑल राऊंडर असलेल्या रवी शास्त्रीला (Ravi Shastri) वेस्ट इंडिज दौऱ्यात मिळालेल्या प्रमोशनची आठवण झाली, तर काहींनी लंच वॉचमन म्हणून जडेजाची टिंगल केली. जडेजाला या प्रमोशनचा फायदा उठवता आला नाही. तरीही त्याला बॅटींगमध्ये प्रमोशन (Ravindra Jadeja Batting Promotion) देण्याचा टीम इंडियाचा निर्णय हा योग्य आहे.

सर्वाधिक यशस्वी

रवींद्र जडेजा हा 2018 पासून विदेशातील पिचवर सर्वात जास्त सरासरी असलेला बॅट्समन आहे. त्याची 15 इनिंगनंतरची सरासरी ही 41.06 आहे. जी विराट कोहली (40.83, 36 इनिंग), पंत (37.26,  28 इनिंग), पुजारा (34. 79, 40 इनिंग) आणि राहाणे (34.16, 38 इनिंग) या सध्याच्या मिडल ऑर्डरमधील कोणत्याही बॅट्समनपेक्षाही जास्त आहे.

जडेजाच्या इनिंग या मिडल ऑर्डरमधील अन्य बॅट्समनपेक्षा कमी आहेत. पण या इनिंगमध्ये त्यानं प्रतिकार करण्याची क्षमता दाखवली आहे. दुसऱ्या नव्या बॉलचा सामना, लोअर ऑर्डर सोबत बॅटींग, सिनिअर खेळाडूला साथ या सर्व जबाबदारी जडेजानं या काळात केल्या आहेत. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर त्याला पाठवण्याचा निर्णय (Ravindra Jadeja Batting Promotion) हा त्याच्या क्षमतेवरील विश्वासातून  आला आहे.

गोंधळात टाकणारी चाल

ओव्हल टेस्टमध्ये रोहित, राहुल आणि पुजारा हे तीन जण आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची अवस्था 3 आऊट 39 अशी नाजूक झाली होती. त्यावेळी जडेजाला पाचव्या नंबरवर प्रमोशन देण्यात आले. पाचव्या नंबरवरील अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या फॉर्मात नाही. रहाणेवर मोठ्या खेळीचा दबाव आहे. या दबावात रहाणेची विकेट गेली असती तर टीम इंडियाची ऑल आऊट 78 च्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल सुरू झाली असती.

IND vs ENG: ‘हे’ 3 जण ठरु शकतात अजिंक्य रहाणेचा पर्याय!

तीन विकेट्स मिळाल्यानं जोशात आलेल्या इंग्लिश टीमला गोंधळात टाकण्यासाठी जडेजाला 5 व्या क्रमांकावर (Ravindra Jadeja Batting Promotion) पाठवण्यात आले. तो 10 रन काढूनच आऊट झाला. पण त्यानं 46 मिनिटं विराट कोहलीला (Virat Kohli) साथ दिली हे विसरता कामा नये.

आत्मविश्वास महत्त्वाचा

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्या खेळाडूला यशस्वी होण्यासाठी त्याचा आत्मविश्वास हा महत्त्वाचा घटक असतो. अजिंक्य रहाणे अधिक अनुभवी आहे. त्याचं बॅटींग तंत्र जडेजापेक्षा चांगलं आहे, यात काहीच दुमत नाही. पण या सीरिजमध्ये जडेजा रहाणेपेक्षा जास्त आत्मविश्वासानं बॅटींग करतोय हे सत्य आहे. तसेच तो रहाणे आणि पंतपेक्षा सातत्यानं रन काढत आहे.

अजिंक्य रहाणेनं या सीरिजमध्ये एकच हाफ सेंच्युरी झळकावली आहे. तर पंतचा आत्तापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर हा 37 आहे. त्या उलट जडेजानं पहिल्या तीन टेस्टमध्ये 56, 40 आणि 30 रनची इनिंग खेळली आहे. तसंच पहिल्या टेस्टपूर्वी झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्येही त्यानं दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती.

ऑल राऊंडर म्हणून विश्वास

रवींद्र जडेजाला या सीरिजमध्ये त्याच्यापेक्षा अधिक अनुभवी आणि यशस्वी बॉलर असलेल्या आर. अश्विनपेक्षा (R. Ashwin) प्राधान्य मिळालं आहे. जडेजाची प्लेईंग 11 (Playing 11) मधील निवड ही फक्त ऑफ स्पिनर म्हणून नाही तर ऑल राऊंडर म्हणून झाली आहे. ऑल राऊंडर हा त्याच्यावरील टॅग अधिक ठळक करण्यासाठी त्याला पाचव्या क्रमांकावर प्रमोशन देण्यात आले.

ओव्हल टेस्टमध्ये त्याला या प्रमोशनचा फायदा उचलता आला नाही. पण भविष्यात तो या नंबरवर चांगली खेळी करु शकतो. त्याला ओव्हलमध्ये अपयश आले. पण आम्ही जडेजाचा ‘ऑल राऊंडर’ म्हणून विचार करत आहोत (Ravindra Jadeja Batting Promotion) हे टीम मॅनेजमेंटनं दाखवून दिलं आहे. आता या सीरिजमधील पाचव्या आणि शेवटच्या टेस्टमध्येही अश्विनपेक्षा त्यालाच प्राधान्य मिळण्याची शक्यता जास्त आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: