फोटो – ICC/X

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या सीरिजचे पडघम आता वाजू लागलेत. इंग्लंडनं महिनाभरापूर्वीच या सीरिजसाठी टीमची घोषणा केली असून सध्या जोरदार तयारी सुरू केलीय. या तयारीनंतरही त्यांना भारतीय स्पिनर्सची भीती सतावत आहे.

कुणी घेतलाय धसका!

इंग्लंडचा टॉप ऑर्डरचा बॅटर बेन डकेट यानं या सीरिजपूर्वी ‘स्काय स्पोर्ट्स’ला बोलताना भारताचा महान ऑफ स्पिनर आर. अश्विनची जोरदार प्रशंसा केली. त्याचबरोबर त्याच्या बॉलिंगचा यापूर्वीचा अनुभवही सांगितला.  

बेन डकेटनं 2016 साली भारत सीरिजमध्ये 2 टेस्ट खेळला होता. त्या टेस्टमधील तीन्ही इनिंगमध्ये त्याला आर. अश्विननंच आऊट केलं होता. त्यानं सात वर्षांपूर्वीच्या भारत दौऱ्यात फक्त 18 रन केले होते.

काय सांगितला अनुभव?

‘मी तेव्हांपासून भरपूर क्रिकेट खेळलो आहे. या कालखंडात माझ्या खेळात परिपक्वता आलीय. भारतीय बॉलर्सना समजणं माझ्यासाठी त्रासदायक नसेल. मी त्या प्रकारच्या पिचवर खेळलोय. तिथं खेळताना काय करायचं हे मला माहिती आहे. त्या परिस्थितीमध्ये अश्विनविरुद्ध चाचपडणारा मी शेवटचा डावखुरा बॅटर नव्हतो. आर. अश्विन चांगली बॉलिंग करतो,’ असं डकेतनं सांगितलं.

मला खात्री आहे की अश्विन मला पुन्हा आऊट करेल. तो वर्ल्ड क्लास बॉलर आहे. पण मी आता चांगल्या आणि फ्लॅट पिचवर स्वत:ला सांभाळून खेळेल. प्रत्येक बॉलवर आक्रमक फटका किंवा स्वीप मारणार नाही,’ असं डकेतनं सांगितलं.

Dhruv Jurel: क्रिकेट किट घेण्यासाठी आईनं सोन्याची चेन विकली! मुलानं टीम इंडियात जागा पटकावली

अश्निन करणार रेकॉर्ड

भारताचाच नाही तर क्रिकेट विश्वातील ‘ऑल टाईम ग्रेट’ बॉलर अशी अश्विनची ओळख आहे.गेल्या 10 वर्षातील सर्वात यशस्वी भारतीय बॉलर असलेला अश्विन 2024 मध्ये नवा रेकॉर्ड करणार आहे.

अश्विननं आत्तापर्यंत 95 टेस्टमध्ये 490 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्टची सेंच्युरी करण्यापासून तो पाच तर 500 विकेट्स पासून 10 पावलांच्या अंतरावर आहे. अश्विन इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये हे दोन्ही रेकॉर्ड नक्की करेल.

R. Ashwin : भारताचा बेस्ट आणि जगातील ऑल टाईम ग्रेट!

बीसीसीआयनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी भारतीय टीमची घोषणा केलीय. त्यामध्ये आर. अश्विसह रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचा समावेश आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्टसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा (व्हाईस कॅप्टन), मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading