फोटो – BCCI/IPL

आयपीएल स्पर्धेतील कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या वाढल्यानं यावर्षीची स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित (IPL 2021 Suspended) करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 56 लीग मॅचेसपैकी 29 मॅच झाल्यानंतर आयपीएलला कोरोनाचा फटका बसला. कोरनामुळे मागच्या वर्षी युरो कप (Euro cup ), टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics)  या स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. त्यानंतर यावर्षी क्रीडा विश्वातील आणखी एका मोठ्या स्पर्धेला कोरोनाचा फटका बसला आहे.

दोन दिवस दुर्दैवी

आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात 3 मे 2021 आणि 4 मे 2021 हे दिवस मोठे दुर्दैवी ठरले. 3 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) या दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्या रात्री होणारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) ही मॅच पुढे ढकलण्यात आली.

त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (Laxmipati Balaji) आणि आणखी एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले. बालाजीचा सीएसकेच्या सर्व खेळाडूंशी संपर्क आल्यानं संपूर्ण टीमला क्वारंटाईन करावं लागलं. बीसीसीआयच्या नियमानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना 6 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स विरुद्ध बुधवारी (5 मे) होणारी मॅच खेळण्यास सीएसकेनं नकार दिला होता.

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्सचा मॅच खेळण्यास नकार! आणखी एक मॅच संकटात

या दोन धक्क्यानंतर मंगळवारी (4 मे) रोजी आयपीएलला आणखी धक्के बसले. सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) विकेट किपर बॅट्समन वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा लेग स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) हे दोघं कोरोना पॉझिटीव्ह आढळले.

अखेर स्पर्धा स्थगित

कोरोनाग्रस्त खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यानं बीसीसीआयनं हा आयपीएल सिझन अनिश्चित काळासाठी स्थगित (IPL 2021 Suspended) केल्याचं जाहीर केलं. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निर्णय एकमतानं घेतला आहे, असं या विषयावर बीसीसीआयच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

“ खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयपीएलशी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षेशी तडजोड करणे बीसीसीआयला मान्य नाही. या सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या अवघड काळात विशेषत: भारतामध्ये या स्पर्धेच्या मार्फत काही सकारात्मकता, आनंद निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता ही स्पर्धा स्थगित (IPL 2021 Suspended)  करणे आवश्यक आहे. आयपीएल 2021 मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना सुरक्षित परतण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा बीसीसीआय पुरवणार आहे.” असं या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: