फोटो – सोशल मीडिया

वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू ब्रायन लाराच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक रन करण्याचा रेकॉर्ड आहे. लारानं जवळपास 20 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध 400 रनची विक्रमी खेळी केली होती. गेल्या दोन दशकांपासून लाराचा हा रेकॉर्ड अबाधित आहे.H

रनमशीन विराट कोहली किंवा वेगानं खेळण्याची क्षमता असलेल्या रोहित शर्मामध्ये लाराचा हा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे, असं मानलं जातं. पण, विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं याबाबत वेगळाच दावा केलाय.

कोण मोडणार लाराचा रेकॉर्ड?

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह स्मिथ हा लाराचा 400 रन करण्याचा रेकॉर्ड मोडू शकेल असं भाकित क्लार्कनं व्यक्त केलंय. ‘ईएसपीएन’च्या ‘अराऊंड द विकेट’ पॉडकास्टवर बोलताना क्लार्कनं स्मिथवर हा विश्वास दाखवलाय.

जिनिअस शब्दही ज्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे असा ब्रायन लारा!

‘मी तुम्हाला स्टिव्ह स्मिथबद्दल सांगतो. त्याला ओपनिंग करण्याची संधी मिळाली तर तो 12 महिन्याच्या आत नंबर 1 टेस्ट ओपनर बनेल. तो त्या क्षमतेचा बॅटर आहे. त्याचं तंत्र जबदरस्त आहे. त्याच्याकडं चांगला बॉल सोडून देण्याची समज आहे. तो हातांचा चांगला वापर करतो. तो काही वेळा चुकू शकतो. LBW देखील होईल पण कोणत्या बॅटरच्या बाबतीत हे घडत नाही हे मला सांगा?’ असा प्रश्न क्लार्कनं विचारला.

क्लार्क इतक्यावरच थांबला नाही. ‘स्मिथला वाट पाहायला आवडत नाही. तो वॉर्नर किंवा ख्वाजनं सेंच्युरी करावी यासाठी वाट पाहत नाही. मार्नसनं डबल सेंच्युरी करावी याचीही तो वाट पाहात नाही. स्वत: डबल सेंच्युरी करण्याची त्याची इच्छा असतो. त्यानं ब्रायन लाराचा 400 रनचा रेकॉर्ड मोडला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तो त्या दर्जाचा बॅटर आहे. ओपनिंगला आल्यावर हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याच्याकडं पुरेसा वेळ असेल.’ असंही त्यानं यावेळी सांगितलं.

लेग स्पिनर म्हणून आला आणि रनमशीन बनला!

स्मिथ करणार ओपनिंग

पाकिस्तानचा 3-0 असा सहज पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आता वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये स्टीव्ह स्मिथ ओपनिंग करणार असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीनं जाहीर केलंय.

स्मिथ त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग करणार आहे. त्याच्या चौथ्या क्रमांकावर कॅमेरुन ग्रीनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 17 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिय विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली टेस्ट सुरू होईल.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

विराटपेक्षा भारी!

स्टिव्ह स्मिथची टेस्टमधील आकडेवारी ही विराट कोहलीपेक्षा भारी आहे. स्मिथनं आत्तापर्यंत 105 टेस्टमध्ये 58.01 च्या सरासरीनं 9514 रन्स केले आहेत. यामध्ये 32 सेंच्युरींचा समावेश आहे.

विराट कोहलीनं 113 टेस्टमध्ये 49.15 च्या सरासरीनं 29 सेंच्युरींसह 8848 रन केले आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading