कोण होता मेंडिस?

तो क्रिकेटमध्ये आला तेंव्हा व्हिडीओच्या साह्यानं मॅचमधील प्रत्येक घटनांचं विश्लेषण (Video Analysis) करण्याची पद्धत सुरु झाली होती. तरीही त्यानं टाकलेला बॉल काय आहे हे शोधण्यासाठी बॅट्समन आणि कोचिंग स्टाफला डोकं खाजवावं लागलं. अंगठा आणि मधलं बोट याच्या साह्यानं पकडलेला तो बॉल गूगली होता? ऑफ ब्रेक होता? लेग ब्रेक होता? दुसरा होता? असे अनेक प्रश्न सर्वांना पडत होते. अखेर त्यांना याचं वेगळचं उत्तर सापडलं तो कॅरम बॉल (Carrom Ball) होता. कॅरम बॉलचा जनक आणि मिस्ट्री स्पिनर ही परंपरा क्रिकेटमध्ये पुन्हा जीवंत करणारा श्रीलंकेचा ऑफ स्पिनर म्हणजे अजंथा मेंडिस. आज मेंडिसचा वाढदिवस (Ajantha Mendis Birthday) आहे. आजच्याच दिवशी 1985 साली मेंडिसचा जन्म झाला.

लष्करातून क्रिकेट करियर

अजंथा मेंडिसनं 13 वर्षांच्या खालील गटातूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.शालेय क्रिकेट गाजवल्यानंतर तो श्रीलंकेतील काही B दर्जांच्या स्पर्धेत खेळत होता. 23 वर्षांखालील वयोगटाच्या एका मॅचमध्ये त्याने श्रीलंकेच्या लष्कराच्या विरुद्ध चांगली कामगिरी केली. श्रीलंकन लष्कराला त्यांच्या क्रिकेट टीममध्ये चांगले बॉलर हवे होते. त्यांनी मेडिंससमोर लष्करातील नोकरीचा प्रस्ताव ठेवला.

लष्कराचा प्रस्ताव येण्याच्या काही दिवस आधी मेंडिसच्या वडिलांचे निधन झाले होते. घर चालवण्यासाठी त्याला नोकरीची गरज होती. त्यामुळे त्याने लष्कराचा प्रस्ताव स्विकारला. त्यानंतर मेंडिसनं लष्कराकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Ajantha Mendis Birthday) खेळण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानमध्ये 2008 साली होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या पूर्वी मेंडिसला नेट बॉलर म्हणून बोलवण्यात आले. श्रीलंकेच्या प्रमुख बॅट्समन्सना त्याची बॉलिंग खेळण्यास अवघड जात होते. त्यामुळे त्याचा आशिया कपपूर्वी होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टीममध्ये समावेश करण्याचा आग्रह महेला जयवर्धनेनं (Mahela Jayawardene) केला. निवड समितीच्या आक्षेपांना डावलत मेंडिसला टीममध्ये घेण्यात जयवर्धने यशस्वी झाला.

वाढदिवस स्पेशल : वटवृक्षाची सावली आधारवड होते तेंव्हा…

ऐतिहासिक पदार्पण

पाकिस्तानमधील कराचीमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) ही 2008 च्या आशिया कपची फायनल होती. ती मेंडिसची आठवी आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच. श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करुन भारतासमोर विजयासाठी 274 रनचे लक्ष्य ठेवले.

गंभीर, सेहवाग, रैना, युवराज आणि धोनी असे स्पिन बॉलर्सना सहज खेळणारे तगडे बॅटर्स टीममध्ये असूनही त्यांचं मेंडिससमोर काहीही चाललं नाही. अजंथा मेंडिसनं (Ajantha Mendis)  त्या मॅचमध्ये फक्त 12 रन देऊन सहा विकेट्स घेतल्या. श्रीलंकेनं भारताचा 100 रननं पराभव करत आशिया कप जिंकला. क्रिकेट विश्वात एका नव्या बॉलरचा उदय (Ajantha Mendis Birthday) झाला होता.

भारताविरुद्ध धुमाकूळ

आशिया कप स्पर्धेनंतर थोड्याच दिवसात भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली. त्या टीममध्ये सचिन, द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण सारखे आशिया कप फायनल न खेळलेले पण स्पिन बॉलिंग अगदी सहजपणे खेळू शकणारे ‘ऑल टाईम ग्रेट’ खेळाडू होते.

त्या सीरिजमधील भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मेंडिसनं टाकलेली पाचवी ओव्हर ऐतिहासिक ठरली. त्याने राहुल द्रविडला (Rahul Dravid) टाकलेला बॉल वेगानं वळला आणि त्याची ऑफ स्टंप उडवून गेला. हाच तो अजंथा मेंडिसनं शोधलेला जगप्रसिद्ध कॅरम बॉल. त्या संपूर्ण सीरिजमध्ये भारताचे दिग्गज बॅट्समन मेंडिससमोर (Ajantha Mendis Birthday) अक्षरश: निरुत्तर होते.

कॅरम बॉलचा जनक : अजंथा मेंडिस

त्यानं 3 टेस्टच्या सीरिजमध्ये 26 विकेट्स घेतल्या. पदार्पणातील सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा 1946 सालापासून अबाधित असलेला रेकॉर्ड मेंडिसनं मोडला. श्रीलंकेनं भारताविरुद्ध टेस्ट सीरिज जिंकली. मेंडिसचा पदार्पणातील सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मागच्या वर्षी अक्षर पटेलनं (Axar Patel) मोडला.

करियरचं ‘टेक ऑफ’

भारताविरुद्धच्या सीरिजनंतर अजंथा मेंडिस (Ajantha Mendis Birthday) हा मुरलीधरनचा वारस आहे असे मानले जात होते. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एकाच मॅचमध्ये सहा विकेट्स घेण्याचा विक्रम दोनदा करणारा मेंडिस हा एकमेव बॉलर आहे. श्रीलंकेनं 2009 आणि 2012 च्या T20 वर्ल्ड कपची फायनल गाठण्यात त्याच्या बॉलिंगचा मोठा वाटा होता. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी मॅचमध्ये पहिल्या 50 विकेट घेण्याचा रेकॉर्ड आजही मेंडिसच्या नावावर आहे. ही कामगिरी त्यानं 19 मॅचमध्ये केली आहे.   

मर्यादा समजली आणि…

स्पिन बॉलर्सना यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना एकाच अस्त्रावर विसंबून राहून चालत नाही. त्यांना सातत्याने वेगवेगळी अस्त्र शोधावे लागतात. बॅट्समनच्या एक पाऊल पुढे असावे लागते. मुरलीधरन, शेन वॉर्न, अनिल कुंबळे आणि आर. अश्विन ही बॅट्समन्सच्या पुढचा विचार करणाऱ्या स्पिन बॉलर्सची प्रमुख उदाहरणं आहेत.

Explained : रवीचंद्रन अश्विन का आहे स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड ?

अजंथा मेंडिस तिथेच कमी पडला. भारतीय बॅट्समन्सनी दोन वर्षींनी त्याच्या बॉलिंगमधील रहस्य शोधले. विशेषत: सेहवागने (Virendrea Sehwag) त्याची चांगली धुलाई केली आणि मेंडिसला क्रिकेट विश्वासमोर उघडे पाडले. त्यानंतर त्याची टेस्ट क्रिकेटमधील जागा गेली. 2014 पर्यंत तो मर्यादीत ओव्हर्सच्या टीममध्ये होता. त्यावर्षी पाटदुखीमुळे तो त्या टीमच्या बाहेर गेला ते नंतर परतला नाही.

आणखी किती मेंडिसचा बळी?

श्रीलंकेनं गेल्या काही वर्षांमध्ये कॅप्टन सातत्यानं बदलले आहे. प्रत्येक सीरिजमधील पराभवानंतर त्यांनी कॅप्टनला बळीचा बकरा बनवला. कॅप्टन बदलला, अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली, पण या खेळाडूंना तयार करणारी यंत्रणा नसल्यानंच श्रीलंकेची ही अवस्था झाली आहे. मुरलीधनरचा वारसदार म्हणून ज्याचा गौरव केला त्या अजंथा मेंडिसच्या (Ajantha Mendis Birthday) कारकिर्दीच्या दुर्दैवी शेवटनंतरही श्रीलंका क्रिकेट बोर्डाला जाग आली नाही. त्यांना जाग येण्यासाठी आणखी किती मेंडिसचा बळी द्यावा लागेल? हा खरा प्रश्न आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: