चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलची शिक्षा आर. अश्विन (R. Ashwin) अजूनही भोगत आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर अश्विनला वन-डे आणि T20 टीममधून वगळण्यात आले. त्यानंतरच्या काळात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या दोन स्पिनर्सवर टीम मॅनेजमेंटचा विश्वास वाढला. सध्या हे दोघेही फॉर्मात नाहीत. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील टेस्ट सीरिजमध्ये आर. अश्विननं जोरदार कामगिरी केली आहे. भारताच्या या सर्वाधिक अनुभवी स्पिनरचा मर्यादीत ओव्हर्सच्या लढतीमध्ये समावेश करण्यात यावा असं मत निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी व्यक्त केलं आहे. अश्विनच्या समावेशाचं कारण देखील वेंगसरकर (Vengsarkar on Ashwin) यांनी सांगितले आहे.

दिलीप वेंगसरकर यांनी ‘संडे एक्स्प्रेस’शी केलेल्या चर्चेत अश्विनच्या समावेशाचं कारण दिलं आहे. ‘मी निवड समितीचा (सध्या) अध्यक्ष असतो तर अश्विनला परत (व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये) घेऊन आलो असतो. त्याच्याकडे अनुभव आणि वैविध्य आहे. स्पिन बॉलर उशीरा परिपक्व होतो. त्याने गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी केली आहे.

तो रेड बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. त्याची टीममध्ये निवड केली तर ते टीमसाठी योग्य ठरेल,’ असे मत वेंगसरकर यांनी (Vengsarkar on Ashwin) व्यक्त केले आहे.

भारतीय स्पिनर्सची निराशा

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरु असलेल्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन मॅचमध्ये भारतीय स्पिनर्सनं निराशा केली आहे. कुलदीप यादवला दोन मॅचमध्ये फक्त 1 विकेट मिळाली. त्यामुळे त्याला तिसऱ्या वन-डेमधून वगळण्यात आले. कृणाल पांड्या (Krunal Pandya) तिसऱ्या वन-डे मध्ये कायम असला तरी त्याने देखील बॉलिंगमध्ये पहिल्या दोन मॅचमध्ये निराशाच केली आहे.

कुलदीप आणि कृणाल या दोघांचीही दुसऱ्या वन-डेमध्ये जोरदार धुलाई झाली. त्यामुळेच टीम इंडियाने दिलेले 336 रनचं आव्हान इंग्लंडनं सहज पार केलं होतं. भारताचा तिसरा स्पिनर युजवेंद्र चहल देखील सध्या फॉर्मात नाहीय. त्यामुळे त्यानेही T20 आणि वन-डे मधील नियमित जागा गमावली आहे.

( Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

विराटची पसंती कोण?

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वी अश्विनची मर्यादीत ओव्हरमधील समावेशाची शक्यता फेटाळून लावली होती. अश्विनपेक्षा वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ही टीमची पसंती असून सुंदर चांगली कामगिरी करत आहे, असा दावा विराटनं केला होता.

वेंगसरकरनं मात्र सुंदरपेक्षा अश्विनला पसंती दिली आहे. स्पिनर्सचं मुख्य काम हे मधल्या ओव्हर्समध्ये विकेट घेणे हे आहे, या कामात अश्विन सरस आहे. क्रिकेट विश्वात सध्या खूप कमी बॉलर अश्विनच्या दर्जाचे आहेत, असे वेंगसरकर (Vengsarkar on Ashwin) यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading