कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका गेल्या दोन वर्षात संपूर्ण जगाला बसला आहे. चीनमधून जगभर पसरलेल्या या व्हायरसनं जवळपास संपूर्ण जग लॉक डाऊन केलं होतं. युरोपातील प्रगत समजल्या जाणाऱ्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेला या व्हायरसनं हादरवून सोडलं. अमेरिकेनं दोन्ही महायुद्ध आणि व्हिएतनाम वॉर याच्यापेक्षा जास्त मृत्यू या व्हायरसमुळे झाले. आता या व्हायरसची दुसरी लाट जगभर थैमान घालत आहे. या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा दुर्दैवानं भारताला बसलाय. भारतामधील परिस्थिती गंभीर आहे. भारतामधील प्रत्येक गोष्टीचं ‘Negativity Unlimited ‘ व्यवस्थेवर जगणारी मंडळी जगभर भांडवल करत आहेत. वास्तवाच्या कित्येकपट अधिक गंभीर परिस्थिती असल्याचा देखावा ही मंडळी या महामारीच्या काळात करत आहेत. या सर्व मंडळींना ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनिंग बॅट्समन मॅथ्यू हेडन (Matthew Hayden On India) यानं खणखणीत उत्तर दिलं आहे.

आयपीएलमुळे जवळ आले क्रिकेटपटू

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेमुळे जगभरातील क्रिकेटपटूंची भारताबद्दलची जवळीकता वाढली आहे. अनेक क्रिकेटपटू भारताला दुसरं घर मानतात. कोरोना महामारीच्या काळात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन या विदेशी क्रिकेटपटूंनी मदत केली.या क्रिकेटपटूंना भारताबद्दल असलेला जिव्हाळा या संकटाच्या प्रसंगात सर्व देशानं पाहिला. हेडन देखील याला अपवाद नाही.

हेडननं देखील त्याच्या भारताबद्दलच्या भावना (Matthew Hayden On India) या अत्यंत सुंदरपणे त्याच्या ब्लॉगमध्ये शब्दबद्ध केल्या आहेत.

हेडनचा भारताबद्दलचा सुंदर ब्लॉग

भारत सध्या महामारीचे तडाखे सहन करत आहे. या प्रकारचं पूर्वी कधीही पाहिलेलं नाही. भारत या व्हायरसचा सामना करतोय आणि जगभरातील मीडिया 140 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशावर टीका करण्याची, आणि वाईट बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत कोणतीही योजना पोहचणे हे देखील एक आव्हान आहे, हे त्यांना माहिती आहे. हा तर महामारीचा काळ आहे.

मी गेल्या एक दशकापासून भारतामध्ये येत आहे. भारतामधील बराच भाग फिरलोय. विशेषत: तामिळनाडूला मी माझं ‘आध्यात्मिक घर’ मानतो. इतक्या विविधतेनं नटलेल्या आणि विशाल देशाचा कारभार चालवण्याची जबाबदारी ज्या नेत्यांवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च आदर आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड नाही, देशात लुडबुड करणाऱ्या बाह्य शक्तींना सचिननं सुनावलं!

मला अत्यंत वेदना होतात

मी भारतामध्ये जिथं गेलो, तेथील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. मी त्यांचा नेहमीच ऋणी असेल. मी अतिशय अभिमानानं म्हणू शकतो की, गेल्या काही वर्षात मी भारताला जवळून पाहिलंय. त्यामुळे फक्त सध्याच्या बिकट परिस्थितीमुळे नाही तर भारताबद्दल जे खराब लिहलं जातंय त्यामुळे माझ्या ऱ्हदयात अत्यंत वेदना होत आहेत.

भारताबद्दल या प्रकारचं लिहिणाऱ्यांना मंडळींना येथील लोकांसमोरच्या आव्हांनाची फारशी कल्पना नसेल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. सध्या जेव्हा जग भारतासाठी दरवाजे बंद करतय आणि भारत सरकारची अवहेलना केली जात आहे. त्यावेळी मी भारतामध्ये राहून माझे विचार व्यक्त करण्याचं ठरवलं. हजारो मैल दूर बसलेल्या लोकांना हे कदाचित समजणार नाही.

Incredible India

मी डेटा तज्ज्ञ नाही. मी काही मीडिया रिपोर्टमधून माहिती गोळा केलीय. ती आश्चर्यकारक आहे. भारतामधील 16 कोटी नागरिकांचं (ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येच्या पाचपट) लसीकरण झालं आहे. दररोज 13 लाख लोकांची चाचणी होत आहे. मी सांगत असलेल्या विशाल आकडेवारी पूर्ण करण्यासाठी आलेल्या आव्हानांकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही.

जेव्हा भारताबद्दल कुणी विचार करतो त्यावेळी अतुल्य (Incredible)एकच शब्द त्याच्या मनात येतो. भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या Incredible India या घोषवाक्यामुळे हा शब्द लोकप्रिय आहे. सध्याचे राजकीय क्रॉसफायर आणि स्कॉट मॉरिसन सरकारनं ऑस्ट्रेलियातील प्रवासावर घातलेल्या अस्थायी बंदी नंतरही या प्राचीन संस्कृतीबद्दलचे माझे कोणतेही विचार बदलले नाहीत.

भारत हा एक प्राचीन संस्कृती असलेला देश आहेत. जगात या प्रकारची समांतर संस्कृतीची उदाहरणं खूप कमी आहेत. सध्याच्या या बिकट परिस्थितीमध्ये भारताबाबत कोणताही निष्कर्ष व्यक्त करण्यापूर्वी देशातील सांस्कृतिक, प्रादेशिक, भाषिक आणि मानवी विकासासंबंधीच्या गुंतागुतीचा आपण विचार करावा.’ असं कळकळीचं आवाहन हेडननं या ब्लॉगमध्ये (Matthew Hayden On India) केलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: