फोटो – BCCI

भारताचा सर्वोत्तम ऑफ स्पिनर असलेल्या आर. अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. राजकोटमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टमध्ये झॅक क्रॉलीला आऊट करत त्यानं हा विक्रम केला. टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा ओलांडणारा अश्विन हा क्रिकेट विश्वातील नववा तर दुसरा भारतीय बॉलर आहे.

ऑल टाईम ग्रेट

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटला विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांनी मोठं केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये मायदेशातील भारताच्या वर्चस्वामध्ये अश्विनचे सर्वात मोठे योगदान आहे.

भारतीय पिचवरील कोणत्याही इनिंगमध्ये अश्विनची बॉलिंग खेळणे हे प्रतिस्पर्धी टीमसाठी सोपे नसते. विराट कॅप्टन असताना भारतानं मायदेशात फक्त 2 टेस्ट गमावल्यात. अश्विनच्या बॉलिंगचं कोडं सोडवण्यात विदेशी खेळाडूंना येत असलेलं वारंवार अपयश हे याचं मुख्य कारण आहे.

प्रयोगाला तयार!

वाढत्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही खेळाडूची शैली डिकोड करणे शक्य आहे. एखादा बॉलर ‘मिस्ट्री’ राहण्याचे दिवस आता संपलेत. त्यानंतरही अश्विन गेल्या 13 वर्षात टीम इंडियाचा मुख्य स्पिनर आहे. याचं कारण म्हणजे प्रयोग करताना न घाबरण्याच्या त्याच्या स्वभावात आहे.

तो ऑन रेकॉर्ड ऑफ स्पिनर आहे. पण, त्याच्या भात्यात वेगवेगळी अस्त्रं आहेत. आपली आयुध अधिक अद्यावत करण्याचा आणि त्यामध्ये नवी भर टाकण्याची त्याची साधना सतत सुरू असते. त्यामुळेच जगातील सर्व दिग्गज बॅटर्सना अश्विनची बॉलिंग खेळणे नेहमी जड जाते.

Explained : रवीचंद्रन अश्विन स्पिन बॉलिंगमधील व्हिव रिचर्ड का आहे?

टेस्ट क्रिकेटमधील सातत्य

अनिल कुंबळेच्या  निवृत्तीनंतर आणि हरभजन सिंगच्या उतरत्या काळात अश्विन टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये आला. भारतीय स्पिन बॉलिंगची धुरा त्यानं त्याच्या खांद्यावर पेलली. सुरुवातीच्या काळात प्रग्यान ओझा आणि नंतर रवींद्र जडेजा  बरोबर अश्विननं भारतीय स्पिनर्सचा जगभर दबदबा कायम ठेवला.

इंग्लंड विरुद्ध 2012-13 च्या सीरिजमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली. मुंबई टेस्टमध्ये केविन पीटरसननं अश्विनची धुलाई केली. पण त्यामधून तो लगेच सावरला. 2013 साली बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया टीमला त्यानं तडाखा दिला.

IND vs ENG : ‘तो मला पुन्हा आऊट करणार’, अश्विनपुढं इंग्लंडच्या खेळाडूनं टेकले गुडघे

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली टेस्ट अश्विनच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चेन्नईमध्ये होती. महेंद्रसिंह धोनीच्या 224 रनमुळे ती टेस्ट सर्वांच्या लक्षात आहे. त्या टेस्टमध्ये अश्विननं पहिल्यांदा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.  होमग्राऊंडवर 10 विकेट्स घेणारा अश्विन हा पहिला भारतीय बनला. त्या सीरिजमध्ये अश्विननं 29 विकेट्स घेतल्या. या सीरिजमधील यशानंतर अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये मागं वळून पाहिलं नाही.

Cricket मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा

टीम इंडिया 2013 पासून भारतामध्ये एकही टेस्ट सीरिज हरलेली नाही. आत्तापर्यंत 97 टेस्टच्या कारकिर्दीमध्ये 10 वेळा ‘प्लेयर ऑफ द सीरिज’चा पुरस्कार मिळवला आहे. या यादीमधील तो पहिला भारतीय आणि एकूण मुरलीधरननंतरचा दुसरा क्रिकेटपटू आहे.

आर. अश्विनचा 500 विकेट्सपर्यंतचा प्रवास

देशटेस्टविकेट्स
अफगाणिस्तान15
ऑस्ट्रेलिया22114
बांगलादेश623
इंग्लंड22*98*
न्यूझीलंड966
दक्षिण आफ्रिका1457
श्रीलंका1162
वेस्ट इंडिज1375

टीप : * भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सध्या सुरु आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या मोबाईलवर वाचण्यासाठी आमचे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा. चॅनेल फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading