फोटो – ट्विटर/ICC

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border-Gavskar Trophy)  चौथी आणि शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं 8 विकेट्सनं जिंकली. दुसरी टेस्ट भारतानंही 8 विकेट्सनं जिंकत मालिकेत कमबॅक केलं. सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये तर टीम इंडियानं (Team India) अक्षरश: ऑस्ट्रेलियाच्या तोंडातला विजयाचा घास बाहेर काढला. सिडनी टेस्ट (Sydney Test) ड्रॉ केली.

आता ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये या सीरिजचा निकाल निश्चित होणार आहे. ऑस्ट्रेलियाला घरचं मैदान, सर्व प्रमुख बॉलर्स, तीन टेस्ट स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि एक टेस्ट डेव्हिड वॉर्नर (David Warner) खेळूनही ऑस्ट्रेलियाला जखमी टीम इंडियाविरुद्ध अजून ही सीरिज जिंकता आलेली नाही.

( वाचा : वीरेंद्र सेहवाग ब्रिस्बेन टेस्ट खेळण्यासाठी सज्ज, BCCI ला दिली खास ऑफर! )

या सीरिजमध्ये वारंवार ऑस्ट्रेलियन मीडिया आणि काही खेळाडू ‘आम्ही टीम इंडियाला ब्रिस्बेनमध्ये हरवू’ अशी गर्जना करत आहे. एकेकाळी समोरच्या टीमला त्यांच्या देशात जावून सहज हरवणारी ऑस्ट्रेलियाची टीम आता फक्त ‘ब्रिस्बेनमध्ये या मग हरवतो’ अशी गर्जना करत असतात. त्याला कारणही आहे.

ब्रिस्बेनमध्ये तगडा रेकॉर्ड

ब्रिस्बेनच्या गॅबा पिचवर ऑस्ट्रेलियाचा अगदी तगडा रेकॉर्ड आहे. ब्रिस्बेनमध्ये नोव्हेंबर 1988 नंतर ऑस्ट्रेलिया एकही टेस्ट हरलेलं नाही. 1988 नंतर या मैदानावर झालेल्या सलग 31 टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम अपराजित आहे.

भारतानं या पिचवर आजवर सहा टेस्ट खेळल्या आहेत. त्या सहापैकी पाचदा भारताचा पराभव झाला आहे. तर फक्त एकदा 2003 -04 च्या दौऱ्यात भारतानं ब्रिस्बेन टेस्ट ड्रॉ केली होती. तेंव्हाचा भारताचा कॅप्टन सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) सेंच्युरीमुळे भारतानं ब्रिस्बेनमध्ये आजवर झालेली एकमेव टेस्ट ड्रॉ केली आहे. भारतीय टीम 2014 नंतर पहिल्यांदाच ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅच खेळणार आहे.

( वाचा : संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स! )

विराट कोहली आणि मुलीचं कनेक्शन

ऑस्ट्रेलियाची टीम नोव्हेंबर 1988 मध्ये वेस्ट इंडिजकडून ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅच हरली होती. वेस्ट इंडिजनं फास्ट बॉलिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनं पराभव केला होता. नोव्हेंबर 1988 मध्येच विराट कोहलीचा (Virat Kohli) जन्म झाला होता. आता 11 जानेवारी रोजी विराटच्या मुलीचा जन्म झाला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे या महिन्यात ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅच खेळणार आहे.

त्यामुळे विराट कोहलीच्या जन्माच्या वेळी जी गोष्ट वेस्ट इंडिजनं केली होती, ती गोष्ट त्याच्या मुलीच्या जन्मावेळी विराटच्या टीमला म्हणजेच आपल्या टीम इंडियाला करण्याची संधी असेल. ब्रिस्बेन टेस्ट जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतामध्ये पुन्हा घेऊन येणे ही विराटला मुलीच्या जन्माच्या निमत्तानं त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेली सर्वोत्तम भेट असेल.    

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading