फोटो/ट्विटर/Wisden India

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship Final 2021) हरल्यानंतर टीम इंडियाच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सीरिजला अद्याप वेळ असल्याने भारतीय खेळाडूंना 20 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. आता टीम इंडियाच्या खेळाडूंना ब्रिटनमध्ये इतरत्र जाण्यास परवानगी देण्यात आली. विदेश दौऱ्यावरील टीमला इतकी मोठी सुट्टी देण्यावर टीम इंडियाचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी नाराजी (Dillip Vengsarkar On Holiday) व्यक्त केली आहे.   

काय म्हणाले वेंगसरकर?

वेंगसरकर यांनी पीटीआयशी बोलताना ही नाराजी व्यक्त केली आहे. “या प्रकारचं वेळापत्रक कसं तयार झालं माहिती नाही. तुम्ही सीरिज सुरु असतानाच सुट्टीवर जाता आणि पुन्हा एकत्र येऊन टेस्ट मॅच खेळणार आहात. फायनल मॅचनंतर एक आठवडा सुट्टी ठीक होती. तुम्हाला सतत खेळत राहण्याची गरज आहे. या प्रकारच्या कार्यक्रमाला मान्यता कशी मिळाली? याचं मला आश्चर्य वाटतं,” अशी टीका (Dillip Vengsarkar On Holiday) वेंगसरकर यांनी केली आहे.

WTC Final 2021: टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं

कोहलीला दिला सल्ला

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने भारतीय बॅट्समननी त्यांचा हेतू स्पष्ट ठेवण्याची सूचना केली केली होती. त्यावर वेंगसरक यांनी कोहलीला देखील सुनावलं आहे. “तुम्ही हेतू स्पष्ट ठेवण्याची गरज व्यक्त करता पण टीमला मॅचची तयारी करण्यासाठी योग्य वेळ का नाही? त्यावेळी तुमचा हेतू कुठे असतो. टीम इंडियाने चार दिवसांचे किमान दोन सामने खेळणे आवश्यक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दरम्यान भारतीय टीमनं दोन वर्ष चांगली कामगिरी केली, पण फायनलसाठी त्यांनी पुरेशी तयारी केली नाही.” असं मत देखील वेंगसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

WTC 2021 : न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होण्याची 5 मुख्य कारणं

दिलीप वेंगसरक हे लॉर्ड्सवर तीन टेस्ट सेंच्युरी करणारे पहिले विदेशी बॅट्समन आहेत. “मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा आनंद लुटला. या कालावधीमध्ये टीम इंडियाने चांगले प्रदर्शन केले. पण कमी तयारीमुळे फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. इतक्या मोठ्या मॅचपूर्वी एकही प्रॅक्टीस मॅच खेळली नाही.” असे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading