फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टेस्टला गुरुवारी अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) सुरुवात होणार आहे. या टेस्टची भारतीय फॅन्सना गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. पहिली टेस्ट ही डे-नाईट होणार आहे. त्यामुळे या टेस्टची वेळ ही वेगळी आहे. ही टेस्ट किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार? भारतीय टीममध्ये कोण आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं एकत्र हवी असतील तर तुम्हाला ही बातमी संपूर्ण वाचली पाहिजे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट कधी आहे?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट ही 17 डिसेंबर 2020, गुरुवारी सुरु होणार आहे.

पहिली टेस्ट कुठे होणार?

अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर पहिली टेस्ट खेळवली जाईल. ही टेस्ट डे-नाईट आहे.

टेस्ट कधी सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता ही टेस्ट सुरु होईल. या टेस्टचा टॉस सकाळी नऊ वाजता होणार आहे.

टेस्ट कुठे पाहता येईल?

भारतामध्ये पहिली टेस्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

कोणत्या अ‍ॅपवर टेस्ट दिसेल?

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचचं Live Streaming हे Sony Liv अ‍ॅपवर पाहता येईल.

पहिल्या टेस्टसाठी भारताची टीम काय आहे?

भारताने पहिल्या टेस्टसाठी अंतिम 11 जणांची घोषणा केली आहे.

भारतीय टीम : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

‘Cricket मराठी’वर काय वाचता येईल?

क्रिकेट विषयक सकस मजकूर मराठी भाषेतून वाचकांना उपलब्ध करुन देणे हा ‘Cricket मराठी’ चा उद्देश आहे. ‘Cricket मराठी’ या वेबसाईटवर भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजचं संपूर्ण कव्हरेज वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला वाचायला मिळेल. त्यासाठी वाचत राहा https://cricketmarathi.com/ 

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading