फोटो – सोशल मीडिया

तो दिवस होत 1 मार्च 2003. त्या दिवशीही महाशिवरात्र होती. संपूर्ण देशभरात महादेवाचे नामस्मरण करण्यात येत होते. त्याचवेळी भारतापासून दूर दक्षिण आफ्रिकेत सचिन तेंडुलकरनं पाकिस्तान विरूद्ध (Sachin Tendulkar vs Pakistan) तांडव केले होते.

‘सचिन तेंडुलकरनं वन-डे क्रिकेटमध्ये खेळलेली आवडती इनिंग कोणती?’ असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाची यादी वेगवेगळी असेल. ते स्वाभाविक आहे. सर्वांच्या वेगवेगळ्या यादीत एक इनिंग नक्कीच कॉमन असेल. त्या इनिंगमध्ये सचिनने सेंच्युरी केलेली नव्हती. सेंच्युरी झाली नसली तरी ती इनिंग शंभर नबंरी सोन्यापेक्षा कमी नव्हती. भारतीय बॅट्समननं वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup) खेळलेली ती एक सर्वोत्तम इनिंग मानली जाते. होय. ‘तुमचा अंदाज बरोबर आहे’. सचिननं 1 मार्च 2003 या दिवशी वर्ल्ड कपमध्ये (Sachin 2003) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) केलेल्या 98 रन्सबद्दल आम्ही बोलतोय. जवळपास दोन दशकानंतरही आजही त्या इनिंगची जादू क्रिकेट फॅन्समध्ये कायम आहे.

वर्ल्ड कपमधील सर्वात चर्चीत अशी ती भारत-पाकिस्तान मॅच (India vs Pakistan) होती. पाकिस्तानचा कॅप्टन वकार युनुसनं (Waqar Younis) टॉस जिंकून तात्काळ बॅटिंग घेतली. भारतासाठी नेहमी डोकेदुखी ठरणाऱ्या सईद अन्वरने (Saeed Anwar) सेंच्युरी झळकावली. त्या सेंच्युरीच्या जोरावर पाकिस्तानने भारतासमोर 274 रन्सचं टार्गेट ठेवलं. T20 क्रिकेट जन्माला येण्याच्या पूर्वीच्या काळात ते टार्गेट कठीण होते. त्यातच पाकिस्तानकडे अक्रम-वकार-अख्तर हे सर्वात धोकादायक फास्ट बॉलर्सचं त्रिकूट होतं.

भारताकडं सचिन होता!

पाकिस्तानकडे कुणीही असलं तरी, भारताकडे सचिन तेंडुलकर (Sachin 2003) होता.  निर्भिड सचिन त्या मॅचमध्ये अगदी सहजतेने पाकिस्तानच्या त्रिकूटाला सामोरा गेला. त्याने त्यांच्या भोवती असलेला भीतीचा पापूद्रा खरवडून काढून टाकला. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा श्रेष्ठ असल्याचा गर्व धुळीस मिळवला. मैदानावरील अस्सल सचिनचा भविष्यात कुणाला अभ्यास करायचा असेल तर पाकिस्तानविरुद्धची ती इनिंग वगळून तो कधीही पूर्ण होणार नाही.

भारताच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड नाही, देशात लुडबुड करणाऱ्या बाह्य शक्तींना सचिननं सुनावलं!

सचिननं पहिल्या बॉलला स्ट्राईक स्वत: घेतली होती. वास्तविक भारतीय इनिंगचा पहिला बॉल खेळण्याचं काम सहसा वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) करत असे. सचिननं पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी खास तयारी केली होती. 274 रन्सच्या टार्गेटचं प्रेशर त्याला माहिती होतं. त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे पहिल्या बॉलला तो सामोरा गेला. अक्रमच्या पहिल्या ओव्हरमध्ये सचिननं बॅकफूटला जात एक खणखणीत फोर मारला. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताने 9 रन्स काढले.

सचिनचा आजही आठवणारा सिक्स!

पाकिस्तानकडून दुसरी ओव्हर टाकायला शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आला. अख्तरच्या पहिल्या तीन बॉलवर काही विशेष घडलं नाही. अख्तरने टाकलेला चौथा बॉल क्रिकेट फॅन्स कधीही विसरणार नाहीत. 151 किमी प्रती तास वेगाने टाकलेल्या त्या बॉलवर सचिनने थर्ड मॅनच्या डोक्यावरुन अप्पर कट मारला. कुणालाही काही कळण्याच्या आगोदर त्या बॉलने सहा रन्सचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर त्या शॉटवर कायमचा सचिन तेंडुलकर ((Sachin 2003) या नावाचा शिक्का बसला आहे.

शोएब अख्तरच्या स्पीडची त्या काळात जगभर दहशत होती. तो ताशी 150 च्या वेगाने सातत्याने बॉलिंग करत असे. शोएबने पुढचा बॉल 152 किमी वेगाने टाकला. सचिनने त्यावर त्याचा खास शैलीतला फोर मारला. शोएबनं पुढच्या बॉलचा स्पीड आणखी वाढवला (154 किमी) सचिनकडून पुन्हा तेच उत्तर आलं. सचिननं ऑन ड्राईव्ह खेचत आणखी एक चौकार मारला. कुणालाही काही समजण्याच्या आत फक्त 6 बॉल्समध्ये सचिननं 20 रन्स (Sachin Tendulkar vs Pakistan) पूर्ण केले.

वीरेंद्र सेहवाग चांगल्या सुरुवातीनंतर आऊट झाला. सौरव गांगुली झटपट परतला. लागोपाठ मिळालेल्या या दोन धक्क्यांचा सचिनवर परिणाम झाला नाही. तो नैसर्गिक पद्धतीने खेळत होता. मोहम्मद कैफसोबत त्याची जोडी जमली. त्याने 37 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पहिल्या 10 ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्ये भारतानं सेहवाग-गांगुलीच्या बदल्यात 88 रन्स केले होते.

सचिनने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये बहुधा पहिल्यांदाच रनर घेतला

हाफ सेंच्युरीनंतर सचिनला त्रास जाणवू लागला. त्याची पळण्याची गती मंदावली. त्यामुळे चौकार मारण्यावर त्याचा भर होता. सचिनचा त्रास इतका वाढला की त्याने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये बहुधा पहिल्यांदाच रनर घेण्याचा निर्णय घेतला. वीरेंद्र सेहवाग त्याचा रनर म्हणून उतरला. मात्र, सेहवागला पळावे लागले नाही. रनर घेतल्या पहिल्याच बॉलवर सचिन आऊट झाला. शोएब अख्तरच्या बॉलवर युनुस खानने सचिनचा कॅच पकडला. सचिनची सेंच्युरी फक्त 2 रन्सने हुकली. मात्र आऊट होण्यापूर्वी त्याने त्याचे काम केले होते.

विराटनं फक्त सचिनच्या ‘त्या’ इनिंगपासून शिकावं, बाकी सर्व आपोआप होईल

राहुल द्रविड – युवराज सिंह जोडीनं सावध खेळ करत सचिनचे प्रयत्न वाया जाणार नाहीत (Sachin Tendulkar vs Pakistan) याची दक्षता घेतली. भारताने वर्ल्ड कपमध्ये सलग चौथ्यांदा पाकिस्तानला पराभूत केलं.  

सचिन तेंडुलकरची अविस्मरणीय खेळी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: