फोटो – ट्विटर, बीसीसीआय

काही क्रिकेटपटूंच्या करिअरचे विश्लेषण करत असताना दुर्दैवी हा एकच शब्द मोठ्या अक्षरात लिहावा लागतो. तो टीम इंडियाच्या सुपर स्पेशल क्लबचा सदस्य आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यानं सातत्यानं रन केले आहेत.फक्त चांगली नाही तर विशेष कामगिरी करूननही त्याला टीम इंडियातून वगळण्यात आलं तसंच आयपीएलमध्येही हा संपूर्ण सिझन त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं बेंचवर बसवलं. या सर्वांनंतरही करूण नायरनं दमदार हाफ सेंच्युरी झळकावत (Karun Nair Half Century) कर्नाटकला (Karnataka) सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या (Syed Mushtaq Ali Trophy) सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

7 बॉलमध्ये 34 रन

दिल्लीत झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटकची लढत बंगालशी होती. या मॅचमध्ये कर्नाटकनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 160 रन काढले. कर्नाटकची सुरूवात स्लो झाली. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या नायरनं फक्त 29 बॉलमध्ये नाबाद 55 रन करत (Karun Nair Half Century)  टीमला सन्मानजनक स्कोअर गाठून दिला.

नायरनं या खेळीत 34 रन फक्त 7 बॉलमध्ये काढले. त्यानं 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं हे रन जमवले. या खेळीत नायरचा स्ट्राईक रेट 190 होता. नवोदीत अभिनव मनोहरनं 9 बॉलमध्ये 19 रन काढत त्याला चांगली साथ दिली. कॅप्टन मनिष पांडेनं (Manish Pandey) 29 रन काढले, पण त्यासाठी त्यानं 34 बॉल खर्च केले.

दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं केला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व ओव्हर्स टाकल्या मेडन!

5 वर्षांपूर्वी रचला इतिहास

नायरनं 5 वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानं त्याच्या करिअरमधील तिसऱ्याच इनिंगमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावली. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) नंतर ट्रिपल सेंच्युरी झळकावलेला तो दुसरा भारतीय आहे. इंग्लंड विरुद्ध चेन्नईत झालेल्या टेस्टमध्ये त्यानं 303 रन केले.

या ऐतिहासिक खेळीनंतरही नायरला फक्त 3 टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये तो फार कमाल करू शकला नाही. त्यामुळे त्याला वगळण्यात आलं. त्यानंतर त्याला कधीही टीम इंडियात संधी मिळाली नाही. टेस्ट टीममध्ये टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये भक्कम बॅटरची गरज आहे, तरीही निवड समितीला त्याची आठवण झाली नाही. त्याला आयपीएलमध्येही मोजकीच संधी मिळाली आहे. या सिझनमध्ये तो KKR चा सदस्य होता. त्याला संपूर्ण सिझनमध्ये एकही मॅच खेळायला मिळाली (Karun Nair Half Century) नाही.

पांडेची कमाल, कर्नाटक सेमी फायनलमध्ये

कर्नाटकला सेमी फायनलमध्ये नेण्यात त्यांचा कॅप्टन मनिष पांडेचं महत्त्वाचं योगदान ठरलं. त्यानं बॅटींगमध्ये फार कमाल केली नाही. पण, दबावाच्या क्षणी जबरदस्त फिल्डिंग केली. 161 रनचा पाठलाग करताना बंगालला शेवटच्या 6 बॉलमध्ये 20 रन हवे होते. ऋत्विक चौधरी आणि आकाशदीप नाथ यांनी विद्याधर पाटीलच्या पहिल्या 5 बॉलमध्ये 19 रन काढत मॅच बरोबरीत आणली.

विराट कोहलीच्या जुन्या सहकाऱ्यासाठी ‘ही’ शेवटची संधी

बंगाल सेमी फायनलला जाणार असंच सर्वांना वाटत होतं. पण, कॅप्टन पांडेनं जिद्द सोडली नाही. त्यानं शेवटच्या बॉलवर डायरेक्ट थ्रो करच आकाशदीपला रन आऊट केलं. शेवटच्या बॉलवर एक रन करण्यात बंगालला अपयश आलं. त्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. सुपर ओव्हरमध्ये पांडेनं सिक्स लगावत कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता सेमी फायनलमध्ये कर्नाटकची लढत विदर्भाशी होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

    

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading