आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिकेची (South Africa) टीम ही चोकर्स म्हणून ओळखली जाते. दक्षिण आफ्रिकेसारखीच चोकर्सची मोठी परंपरा ही न्यूझीलंडला देखील आहे. या टीमनं ICC स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये सातत्याने प्रवेश केला आहे. त्यानंतर मागच्या दोन वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्येही प्रवेश केला होता. पण त्यांना ICC वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंडने आयसीसीचं एकमेव विजेतेपद 2000 साली केनियात झालेली नॉक ऑऊट स्पर्धा (ICC Knockout) जिंकून पटाकवलं आहे. स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) हा एकमेव न्यूझींडलचा कॅप्टन आहे, ज्याने ICC स्पर्धा जिंकली आहे. न्यूझीलंडच्या या एकमेव कॅप्टनचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (1 एप्रिल 1973) फ्लेमिंगचा जन्म झाला.

टीम बांधणारा जनरल

टेस्ट क्रिकेटमधील 9 सेंच्युरी हे प्लेमिंगच्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचं योग्य वर्णन नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये 7 हजार रन आणि 10 पेक्षा कमी सेंच्युरी करणारा फ्लेमिंग हा एकमेव बॅट्समन आहे. पण सांघिक खेळात खेळाडूंची कामगिरी ही टीमची गरज पूर्ण करणारी किती आहे? या दृष्टीने पाहयची असते. एक बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून फ्लेमिंगने ती कामगिरी पूर्ण केली.

रिचर्ड हॅडली (Richard Hadlee) आणि मार्टीन क्रो (Martin Crowe) यांच्या काळात न्यूझीलंड क्रिकेटनं 1980 च्या दशकात त्यांचा चांगला काळ पाहिला होता. प्लेंमिंगनंही एक कॅप्टन म्हणून टीमची बांधणी केली आणि तो काळ परत आणला. डॅनियल व्हिटोरी, रॉस टेलर, ब्रँडन मॅकलम, टीम साऊदी या सारखे न्यूझीलंडचे खेळाडू फ्लेमिंगच्या काळातच तयार झाले.

( वाचा : शोएब अख्तरचे करियर संपवणारा बॅट्समन! )

स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) हा नव्या खेळाडूंसह टीम बांधणारा न्यूझीलंडचा जनरल होता. त्यामुळेच तो रिटायर होताना न्यूझींडलंचा सर्वात यशस्वी कॅप्टन बनला. भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या देशांविरुद्ध फ्लेमिंगच्या कॅप्टनसीखाली न्यूझीलंडने टेस्ट सीरिज जिंकली. फ्लेमिंगनं 80 टेस्ट, 218 वन-डे आणि 5 T20 अशा एकूण 303 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये न्यूझीलंडची कॅप्टनसी केली आहे.

संस्मरणीय खेळी

2003 च्या वर्ल्ड कपमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलेली सेंच्युरी ही फ्लेमिंगच्या करियरमधील एक संस्मरणीय खेळी आहे. श्रीलंकेविरुद्धचा पराभव आणि सुरक्षेच्या कारणामुळे केनियात जाण्यास दिलेला नकार यामुळे न्यूझींडला ती मॅच जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक होते.

दक्षिण आफ्रिकेच्या 306 रनला उत्तर देताना पावसाचा अडथळा आलेल्या मॅचमध्ये फ्लेमिंगनं नाबाद 134 रनची खेळी केली होती. डोनाल्डला चौकार मारुनच फ्लेमिंगनं न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

निस्वार्थी फ्लेमिंग!

स्वत:पेक्षा टीमच्या कामगिरीचं मोल फ्लेमिंगला अधिक होते. याचे उदाहरण म्हणजे 2003 साली कोलंबोमध्ये झालेली टेस्ट. या टेस्टमध्ये 274 रनवर नाबाद असताना फ्लेमिंगने मॅचचा निकाल लागावा म्हणून इनिंग घोषित केली होती.

( वाचा : On This Day : सचिन तेंडुलकरची पाकिस्तानला पराभूत करणारी अविस्मरणीय इनिंग )

मार्टीन क्रो यांचा 299 रनचा रेकॉर्ड मोडून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा न्यूझीलंडचा खेळाडू होण्याची संधी फ्लेमिंगला होती. पण त्यापेक्षा त्याने मॅच निकालात लागावी म्हणून प्रयत्न केले.

आयपीएलचा यशस्वी कोच

फ्लेमिंग 2007 च्या वर्ल्ड कप नंतर रिटायर झाला. त्यानंतर तो भारतीयांना चेन्नई सुपर किंग्स (CSK) या आयपीएल टीमचा कोच म्हणून अधिक माहिती झाला आहे. 2009 सालापासून फ्लेमिंग CSK टीमचा कोच आहे. तो आयपीएलमधील सर्वात जुना कोच आहे.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) बरोबर त्याने आयपीएलमध्ये मोठी पार्टरनरशिप केली आहे. चेन्नईचे तीन आयपीएल विजेतेपद, चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आणि एक यशस्वी फ्रँचायझी बनवण्यात कोच फ्लेमिंगचा मोठा वाटा आहे. 2018 साली दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नईची टीम आयपीएलमध्ये परतली. त्यावर्षी ज्येष्ठ खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरण्याच्या फ्लेमिंगच्या निर्णयावर मोठी टीका झाली. पण फ्लेमिंगचा स्वत:च्या डावपेचावर विश्वास कायम होता. त्यावर्षी चेन्नईनं विजेतपद मिळवले. पुढच्या वर्षी चेन्नईचे विजेतपद अगदी थोडक्यात हुकले.

( वाचा : IPL 2021 CSK : सर्व बदल ‘Definitely Not’, हवे तितके बदल Yes! )

चेन्नई सुपर किंग्ससाठी 2020 ही स्पर्धा निराशाजनक ठरली. या पराभवानंतर जनरलचा स्वभाव असलेल्या स्टीफन फ्लेमिंगनं या पराभावाची कारणं नक्की शोधली असतील. या आयपीएलमध्ये हा जनरल स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) कोणत्या रणणितीसह मैदानात उतरतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: