फोटो – ट्विटर

अंडर 19 पासूनच त्याची स्पर्धा ही तेव्हा सर्वोत्तम फॉर्मात असलेल्या आकाश चोप्रा, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या टीम इंडियातील दिग्गजांशी होती. सेहवाग-गंभीरमुळेच त्याला टीम इंडियातही जागा मिळत नव्हती. 9 वर्षांच्या परिश्रमानंतर त्याला अखेर टेस्ट कॅप मिळाली. त्यानं पहिल्याच इनिंगमध्ये दमदार रेकॉर्ड केला. या सुरुवातीनंतरही टेस्ट क्रिकेटमध्ये तो फार काळ टिकला नाही. वन-डे क्रिकेटमध्ये स्थिरावला. आयसीसी स्पर्धांमध्ये (ICC Tournament) दमदार कामगिरी करण्याचा त्याचा इतिहास आहे.  टीम इंडियानं शेवटच्या जिंकलेल्या ICC ट्रॉफीचा शिल्पकार असलेल्या शिखर धवनचा आज वाढदिवस (Shikhar Dhawan Birthday) आहे. आजच्याच दिवशी (5 डिसेंबर 1985) रोजी धवनचा जन्म झाला.

नावाजलेल्या गुरुंचा चेला

शिखर धवननं क्रिकेट खेळण्यास देशातील प्रसिद्ध क्रिकेट कोच तारक सिन्हा यांच्या अकादमीमध्ये केली. सिन्हा सरांनी भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिली आहेत. अतूल वासन, मनोज प्रभारकर, रमन लांबा, अजय शर्मा, आशिष नेहरा आकाश चोप्रा आणि सध्याच्या टीम इंडियातील ऋषभ पंत ही त्याधील प्रमुख उदाहरणे आहेत. धवनही सिन्हा सरांचा शिष्य आहे.

शिखर धवननं विकेट किपर म्हणून सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षीच अंडर-15 टीममध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली. धवनकडे सुरुवातीच्या टॅलेंटपेक्षा निडर वृत्ती जास्त होती, असं  सिन्हा सरांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 12 व्या वर्षी झळकालेल्या सेंच्युरीनंतर सिन्हा सरांनी त्याला बॅटर म्हणून खेळण्याचा सल्ला दिला.

टीम इंडियाला सर्वाधिक गरज असताना खेळलेला जिगरबाज!

पदार्पणापूर्वीचा संघर्ष

धवन (Shikhar Dhawan Birthday)  वयाच्या 15 व्या वर्षीच अंडर 17 आशिया कप स्पर्धेत खेळला. त्यामधील 3 मॅचमध्ये त्यानं 85 च्या सरासरीनं रन केले. त्यामुळे त्याची आधी दिल्लीतील आणि नंतर टीम इंडियाच्या अंडर 19 टीममध्ये प्रमोशन झाले. 2004 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्यानं 505 रन काढले. हा आजवरच्या सर्व अंडर 19 वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड आहे. धवनला तेव्हापासून आयसीसी स्पर्धांची गोडी लागली.

चॅलेंजर्स ट्रॉफी 2005 मध्ये धवन टीम इंडिया सिनिअर्स टीमकडून खेळला. त्यावेळी तो फक्त 19 व्या वर्षांचा होता. त्यामधील एका मॅचमध्ये त्यानं महेंद्रसिंह धोनीसोबत (MS Dhoni) पहिल्या विकेटसाठी 187 रनची पार्टनरशिप केली होती. त्यानं आयपीएल स्पर्धेत 2008 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Daredevils) टीमकडून केली.

पहिल्या सिझनमध्ये चांगली कामगिरी करुनही दिल्लीनं त्याला मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) देऊन टाकले.  मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या दोन आयपीएल सिझनमध्ये तो फेल गेला. दरम्यानच्या काळात त्याला 5 वन-डेमध्ये संधी मिळाली, त्यामध्येही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन वर्ष जवळपास अज्ञातवासात काढल्यानंतर 2013 साली धवनसाठी परिस्थिती चांगली होण्यास सुरुवात झाली.

सचिन तेंडुलकरनंतर मैदानात निरोप मिळालेला एकमेव भारतीय

Dream Year

शिखर धवननं मार्च 2013 मध्ये वीरेंद्र सेहवागच्या (Virendrea Sehwag) जागी मोहाली टेस्टमध्ये पदार्पण केले. सेहवागची जागा घेणे हे सोपे काम नव्हते. पण, धवननं त्याच्या स्टाईलनं दमदार सुरुवात केली. मोहाली टेस्टमध्ये त्यानं फक्त 85 बॉलमध्ये सेंच्युरी केली. तो 174 बॉलमध्ये 187 रन काढून आऊट झाला. या खेळीत त्यानं 33 फोर आणि 2 सिक्स लगाले. टीम इंडियाच्या कोणत्याही क्रिकेटचा पदार्पणातील टेस्टमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे.

ऑस्ट्रेलिया सीरिज गाजवल्यानंतर त्याची इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पिन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2013) टीममध्ये निवड झाली. त्यामध्ये तर त्यानं कमालच केली. फक्त 5 मॅचमध्ये 2 सेंच्युरीसह स्पर्धेत सर्वाधिक 363 रन काढले. धवनची या स्पर्धेतील सरासरी होती 90.73! धवननं प्रत्येक मॅचमध्ये केलेल्या दमदार खेळामुळे (Shikhar Dhawan Birthday)  टीम इंडियानं ती चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर गेल्या 8 वर्षात भारतीय क्रिकेट टीमला एकाही ICC स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेले नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतामध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्येही त्यानं सेंच्युरी झळकावली. शिखर धवननं 2013 साली 26 वन-डेमध्ये 5 सेंच्युरीसह 1162 रन केले. 2013 पासून टीम इंडियाच्या वन-डे टीमसाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बरोबरीनं त्याचे नाव घेतले जाऊ लागले.

बॅड पॅच आणि 2015 वर्ल्ड कप

टीम इंडिया 2013 सालाच्या शेवटी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली. त्या दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये धवननं संघर्ष केला. पण, लगेच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये 115 आणि 98 रन काढत त्याची भरपाई केली. टीम इंडिया 2014 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली. त्या दौऱ्यात धवन सपशेल फेल गेला. त्या दौऱ्यातील 6 इनिंगमध्ये 37 हा त्याचा बेस्ट स्कोअर होता. त्यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही ब्रिस्बेन टेस्टमधील 81 रनच्या इनिंगचा अपवाद वगळता धवन चालला नाही.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये 2015 साली वर्ल्ड कप स्पर्धेत (Cricket World Cup 2015) धवन पुन्हा एकदा फॉर्मात आला. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये त्यानं 72 रनची महत्त्वाची इनिंग खेळली. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्टेन आणि मॉर्केल या फास्ट बॉलर्सचा सहज सामना करत 137 रन काढले. धवनच्या या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच पराभूत केले. धवननं (Shikhar Dhawan Birthday) संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये 412 रन काढले.

वर्ल्ड कपनंतरचा धवन

2015 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात विराट कोहलीचं (Virat Kohli) युग सुरु झालं. रोहित आणखी मोठा झाला. धवनच्या खेळात विराटचं सातत्य किंवा रोहितच्या मोठ्या इनिंगची स्पेशालिटी नव्हती. पण, तो त्याची जागा राखून होता. 2016 साली सनरायझर्स हैदराबादनं (SRH) आयपीएल स्पर्धा जिंकली. त्या सिझनमध्ये धवननं चांगला खेळ केला होता.

टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या तंत्रातील दोष अधिक ठळकपणे पुढे आले. 2018 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यात धवन शेवटची टेस्ट खेळला. केएल राहुलसाठी (KL Rahul) त्याला जागा रिकामी करुन द्यावी लागली.

2017 साली इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) झाली. त्या स्पर्धेतील 5 मॅचमध्ये त्यानं सर्वात जास्त 338 रन काढले. त्यामध्ये 1 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरीचा समावेश होता. पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये 339 रनचा पाठलाग करताना मोहम्मद आमिरच्या (Mohammad Amir) बॉलिंगवर रोहित शर्मा (0) आणि विराट कोहली (5) रन काढून आऊट झटपट आऊट झाले. आमिरनंच धवनला 21 रनवर आऊट करत टीम इंडियाच्या परतीचे मार्ग बंद केले.

2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये धवननं 117 रन काढून दमदार सुरूवात केली. पण तो फक्त 2 मॅच खेळून दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. फक्त धवनसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी हा मोठा धक्का होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही ट्विट करत धवनच्या दुखापतीची (Shikhar Dhawan Birthday) दखल घेतली होती.

मोठे आव्हान

शिखर धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसमोर सध्या मोठे आव्हान आहे. T20 क्रिकेटमध्ये सातत्यानं खेळूनही त्याला या प्रकारात निवड समितीने फार गांभिर्यानं घेतले नाही. वन-डे टीममधील त्याची जागा देखील नव्या दमाच्या खेळाडूंमुळे धोक्यात आली आहे. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये होते, त्यावेळी श्रीलंकेत गेलेल्या युवा टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) तो कॅप्टन होता. पण, T20 वर्ल्ड कपसाठी त्याचा विचार झाला नाही.

आयपीएल 2020  आणि 2021 साठी दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) त्यानं सर्वात जास्त रन केले. तरीही त्याला पुढील सिझनसाठी (IPL 2022) रिटेन केले नाही. शिखर धवनसमोर (Shikhar Dhawan Birthday) येणाऱ्या काळात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading