फोटो – ट्विटर / ICC

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने 6 आऊट 233 रन्स काढले. पहिल्या दिवसाचा खेळ पाहून अ‍ॅडलेडच्या पिचवर किती स्कोअर सेफ असेल याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला भारताचा (Team India) बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) उत्तर दिलं आहे.

किती स्कोअर सेफ?

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुजारानं या खेळासंबंधीची सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. त्यावेळी पहिल्या इनिंगमध्ये 350 हा चांगला स्कोअर असेल असं उत्तर पुजारानं दिलं. भारतानं पहिल्या दोन सत्रामध्ये अनुक्रमे 41 आणि 66 रन्स काढले होते, या दोन सत्रात भारतानं संथ खेळ केला असं काही त्याला वाटत नाही. पहिल्या दोन्ही सत्रात भारताची स्थिती चांगली होती असा दावा त्यानं केला.

“बॉल स्विंग होत असताना विकेट न गमावण्यावर आमचा भर होता. आम्हाला अधिक फटकेबाजी करुन आऊट व्हायचं नव्हतं. टेस्ट क्रिकेटसाठी हा चांगला दिवस होता. आमचे डावपेच यशस्वी झाले. पहिल्या दिवशी टीम ऑल आऊट व्हावी अशी आमची इच्छा नव्हती”, असं पुजारानं सांगितलं. स्वत:च्या संथ खेळाचाही पुजारानं यावेळी बचाव केला.

“टेस्ट क्रिकेटमध्ये संयम आवश्यक आहे. पाटा पिचवर तुम्ही वेगानं रन काढू शकता. बॉलर्सना पिचची मदत मिळत असेल तर तुम्हाला काळजीपूर्वक फटकेबाजी करावी लागते,’’ असे मत भारताच्या या टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समननं व्यक्त केले.

( वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा )

‘त्या’ चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा

अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या गोंधळातून विराट रन आऊट झाला. या चुकीमुळे ऑस्ट्रेलियाचा फायदा झाला असं पुजारानं मान्य केलं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिन नॅथन लायनचीही पुजारानं प्रशंसा केली. गेल्या पाच वर्षात त्याच्या बॉलिंगमध्ये खूप सुधारणा झाली आहे. त्यानं लाईन आणि लेन्थवर प्रचंड काम केलं असल्याचं पुजारानं सांगितलं. डिनर ब्रेकनंतर लायन आणि पुजारामध्ये चांगला सामना रंगला होता. अखेर लायननंच त्याला 43 रन्सवर आऊट केलं.

( वाचा : स्मिथ-वॉर्नर नाही तर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचा आहे टीम इंडियाला मोठा धोका! )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: