फोटो – ट्विटर

क्रिकेटपटू दोन प्रकारचे असतात. पहिल्या गटातले खेळाडू मैदानावर प्रदर्शन करतात. दुसऱ्या गटातील खेळाडूंनी मैदानात भरीव कामगिरी काय केली हे आठवण्यासाठी गूगलची मदत घ्यावी लागते. त्याचवेळी ते मैदानाच्या बाहेर मात्र त्याला आवडणाऱ्या क्रिकेटपटूंची तोंडभरुन स्तुती आणि न आवडणाऱ्या खेळाडूंची खुसपटं काढणे हे त्यांचं मुख्य काम असतं. होय, आम्ही टीम इंडियाचा माजी बॅट्समन आणि आता कॉमेंट्रेटर असलेल्या संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) बद्दल बोलत आहोत. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नंतर आता मांजरेकर आता टीम इंडियाच्या बॉलिंगचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या रविचंद्रन अश्विनवर (Manjrekar on Ashwin) घसरला आहे.

अश्विनची अलिकडील कामगिरी काय?

टीम इंडियाच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विननं (Ravichandran Ashwin) डोकेबाज खेळ करत स्टीव्ह स्मिथसह अनेक मोक्याच्या विकेट्स घेतल्या. सिडनी टेस्टमध्ये सारं शरीर जखमी झालेलं असताना हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत 256 बॉलमध्ये  62 रनची नाबाद महाचिवट पार्टरनशिप केली. त्यामध्ये अश्विनचा वाटा 128 बॉलमध्ये 39 रन असा होता.

ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध (India vs England) मायदेशात टेस्ट सीरिज खेळली. या सीरिजमध्ये अश्विननं 4 टेस्टमध्ये 32 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर एका सेंच्युरीसह 189 रन काढले. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) 35 पेक्षा जास्त विकेट्स आणि एक सेंच्युरी झळकावणारा अश्विन हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

मांजेरकर काय म्हणाला?

टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) इंग्लंडमध्ये आहे. वर्ल्ड कप सेमी फायनलपूर्वी (Cricket World Cup 2019) जडेजावर टीका करणाऱ्या मांजरेकरला अश्विनवर घसरण्यासाठी हा एकदम चांगला कालखंड आहे. त्यामुळे त्याने ‘ESPNCricinfo’ वरील एका कार्यक्रमात बोलताना अश्विन (Manjrekar on Ashwin) ‘ऑल टाईम ग्रेट’ नाही असे ठासून सांगितले.   

“त्याला (अश्विनला) लोकं ऑल टाईम ग्रेट म्हणतात त्यावर माझा आक्षेप आहे. पहिला आक्षेप म्हणजे माझ्याकडं अश्विनचा SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशातील रेकॉर्ड आहे. या देशात अश्विननं एकादाही इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतलेल्या नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय पिच हे त्याच्या बॉलिंगसाठी उपयुक्त मानले जाते. त्यावर गेल्या चार वर्षांमध्ये जडेजानं अश्विनच्या बरोबरीनं विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये अक्षर पटेलला (Axar Patel) अश्विनपेक्षा जास्त विकेट्स मिळाल्या आहेत. त्याला खराखुरा ‘ऑल टाईम ग्रेट’ म्हणून स्वीकारण्यास माझा त्यामुळे आक्षेप (Manjrekar on Ashwin) आहे.” असे मांजरेकरने सांगितले.

Explained: रवीचंद्रन अश्विन का आहे स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड?

SENA देशांमध्ये अश्विन

संजय मांजरेकरनी 4 देशांचा उल्लेख केला आहे. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेत अश्विननं 3 टेस्टमध्ये 7,  इंग्लंडमध्ये 6 टेस्टमध्ये 14, न्यूझीलंडमध्ये 1 टेस्टमध्ये 3 तर ऑस्ट्रेलियात 10 टेस्टमध्ये 39 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी एकाही देशात त्याला इनिंगमध्ये 5 विकेट्स घेता आलेल्या नाहीत.

अश्विनने या चार देशांमध्ये सर्वात जास्त 10 टेस्ट ऑस्ट्रोलियात तर अन्य तीन देशांमध्ये मिळून 10 टेस्ट खेळल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये तर फक्त 1 टेस्ट अश्विननं खेळली आहे. इतक्या कमी सॅम्पलवर मांजरेकरनी अश्विनला या देशांमध्ये मोडीत काढले आहे. ज्या ऑस्ट्रेलियात अश्विननं 10 टेस्ट खेळल्या आहेत, तिथं तो किती प्रभावी ठरलाय हे आपण काही महिन्यांपूर्वीच पाहिले आहे.

देशटेस्टइनिंगविकेट्सइकॉनॉमी रेट इनिंगमधील सर्वोत्तम कामगिरी
दक्षिण आफ्रिका3672.724/113
इंग्लंड69142.634/62
न्यूझीलंड1133.423/99
ऑस्ट्रेलिया 1018392.934/55

अश्विनचा बॉलर म्हणून प्रभाव

टीम इंडियाची फास्ट बॉलिंग गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं उंचावत आहे. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे फास्ट बॉलर्स गेल्या काही वर्षात उदयाला आले आहेत. एकाच वेळी टीममध्ये तीन किंवा चार बॉलर्स चांगले बॉलर्स असल्यानं विकेट्स विभागल्या जातात. एक बॉलर दबाव निर्माण करतो. त्याचा फायदा दुसऱ्या बॉलरला होतो. टीमसाठी दोन्ही बॉलर्स तितकेच महत्त्वाचे असतात.

या चार देशांपैकी फक्त न्यूझीलंडमध्ये जिथं अश्विन फक्त एका इनिंगमध्ये बॉलिंग केली आहे, तिथं त्याचा इकॉनॉमी रेट हा 3 पेक्षा जास्त (3.41) आहे. त्यावरुन अश्विननं या देशातही बॅट्समनला जखडून ठेवलं असल्याचं सिद्ध होतं. आणि फक्त आकड्यांचाच विचार करायचा असेल तर अश्विननं 5 जून 2010 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजवर सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय विकेट्स अश्विननं घेतल्या आहेत. मागील 11 वर्षांच्या कालखंडात अश्विननं जगातील सर्व बॉलर्सना याबाबतीत मागे टाकलं आहे.

मांजरेकर आणि अश्विन

टीम इंडियाचाच नाही तर जगातील महान ऑल राऊंडर असेल्या कपिल देवने (Kapil Dev) टेस्ट क्रिकेटमध्ये 8 सेंच्युरीसह आणि 434 विकेट्स घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स आणि 5  सेंच्युरी आणि 400 पेक्षा जास्त विकेट्स (409) झळकावण्याची कामगिरी करणारा कपिल देवनंतर अश्विन हा फक्त दुसराच क्रिकेटपटू आहे.

संजय मांजरेकरनं आकडेवारीचा आधार घेत अश्विनवर टीका केली आहे. त्यामुळे आणखी एक आकडेवारी सांगण्याचा मोह होत आहे. निव्वळ बॅट्समन म्हणून टीम इंडियामध्ये खेळलेल्या संजय मांजरेकरच्या खेळात सातत्य इतके होते की त्याला 9 वर्षांमध्ये फक्त 37 टेस्टमध्ये संधी मिळाली. या 37 टेस्टमध्ये त्याने 4 सेंच्युरी आणि 9 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर अश्विननं आजवर 78 टेस्टमध्ये 5 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तरीही जग मांजरेकरला बॅट्समन आणि अश्विनला ऑल राऊंडर न समजता बॉलर समजतं.

‘वर्ल्ड कप सेमी फायनलमधील तलवारबाजी मांजरेकरसाठीच होती’

संजय मांजरेकरच्या टीकेनंतर रवींद्र जडेजाचा फॉर्म सुधारला. आता मांजरेकर अश्विनवर (Manjrekar on Ashwin) घसरला आहे. त्याच्या पोटदुखीनंतर अश्विनचा सध्या चांगल्या असलेल्या फॉर्मने आणखी उंची गाठली तर ‘Cricket मराठी’ सह सर्व भारतीय फॅन्स मांजरेकरचे आभार मानतील.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading