फोटो – ट्विटर/ICC

तो 10 वर्षांच्या क्रिकेट करियरमध्ये फक्त 32 टेस्ट, 60 वन-डे आणि 25 T20 खेळलाय. सतत टीमच्या आत-बाहेर राहण्याची त्याला आता सवय झालीय. याचे कारण हे केवळ कामगिरी नाही तर दुखापतीचा मोठा इतिहास आहे. ‘मी ऑस्ट्रेलियन्सचा सर्वात न आवडता क्रिकेटपटू आहे,’ अशी कबुली त्याने स्वत: दिली होती. या सर्व इतिहासानंतरही आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये पश्चिम आशियाचा ऑल राऊंडर आणि मार्श कुटुंबीयांमधील सर्वात धाकटा मिचेल मार्श आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये (Mitchell Marsh for T20) ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा आधार असणार आहे.

साधारण सुरुवात

मिचेल मार्श हा अगदी वयाच्या 18-19 वर्षांपासून T20 क्रिकेटमधील फ्री एजंट बनला. तो आयपीएलमधील 2011 ते 13 या काळात पुणे वॉरियर्सचा सदस्य होता. पर्थ स्कॉचर्स (Perth Scorchers) या बिग बॅश लीगमधील  टीमचाही तो 2011 पासून सदस्य आहे. त्याच्या ऑल राऊंड क्षमतेमुळे त्याला ऑस्ट्रेलियाकडूनही 2011 मध्येच संधी मिळाली. त्याच्या गुणवत्तेचा विचार करत त्याला त्यानंतरही वारंवार ती संधी देण्यात आली.

या सर्व जमेच्या बाजूनंतरही मिचेल मार्शला आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये स्वत:  सिद्ध करण्यास बराच वेळ लागला. अगदी या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या T20  सीरिजमध्येही मिचेल मार्शनं निराशा केली. त्याला अ‍ॅश्टन अगरच्या नंतर सातव्या क्रमांकावर बॅटींगला पाठवण्यात आले.

वेस्ट इंडिजमध्ये संधी

न्यूझीलंड विरुद्धच्या कामगिरीनंतर मिचेल मार्शसाठी ऑस्ट्रेलियन टीममधील कमबॅक अवघड मानले जात होते. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यातून डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉईनिस यांनी माघार घेतल्यानं त्याची वेस्ट इंडिज सीरिजसाठी निवड झाली. मार्कस स्टॉईनिसची (Marcus Stoinis) रिप्लेसमेंट म्हणून त्याची निवड झाली. ही निवड एकाच दौऱ्यासाठी असून T20 वर्ल्ड कपमध्ये (Mitchell Marsh for T20) स्टॉईनिस परत येणार हे नक्की होते.

लेग स्पिनर म्हणून आला आणि रन मशीन बनला!

एका दौऱ्यामध्ये बदललं समीकरण

वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरिजमध्ये मार्शला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा टीम मॅनेजमेंटनं घेतला. त्याने या सीरिजमध्ये तो निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. ऑस्ट्रेलियाचा सीरिजमध्ये 1-4 असा पराभव झाला, पण मार्शनं त्याचं नाणं खणखणीत सिद्ध केलं.

मार्शनं या सीरिजमधील 5 मॅचमध्ये 43.80 च्या सरासरीनं 219 रन काढले. त्याचा स्ट्राईक रेट 152.08 होता. या दौऱ्यापूर्वी त्याची आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एकही हाफ सेंच्युरी नव्हती. त्या या सीरिजमध्ये 3 हाफ सेंच्युरी झळकाल्या. दोन्ही टीमकडून सर्वात जास्त रन मार्शनं काढले. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील सिमन्सपेक्षा त्याने 54 रन जास्त काढले आहेत. त्याशिवाय त्याने 6.76 च्या इकॉनॉमी रेटनं 8 विकेट्स घेतल स्वत:ची या ऑल राऊंडर म्हणून क्षमता सिद्ध केली.

T20 वर्ल्ड कपचा आधार

T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर मिचेल मार्शला गवसलेला फॉर्म ही ऑस्ट्रेलियाला दिलासा देणारी गोष्ट आहे. स्टिव्ह स्मिथ संपूर्ण फिट नाही. तो दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये नंबर 3 वर बॅटींग करु शकेल असा समर्थ पर्याय ऑस्ट्रेलियाला सापडला आहे. तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला येऊन संपूर्ण इनिंगला आकार देण्याची महत्त्वाची जबाबदारी मार्शवर असेल. एकेकाळी ऑस्ट्रेलियासाठी व्हिलन ठरलेला मार्श आता त्यांचा आधारस्तंभ (Mitchell Marsh for T20) बनला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: