फोटो – ट्विटर

वन-डे क्रिकेटमध्ये एखादी डबल सेंच्युरी असली तर ती आजही मोठी गोष्ट मानली जाते. रोहित शर्माच्या (Rohit Shrama) नावावर 3 डबल सेंच्युरी आहेत. तो आला तेव्हापासून त्याच्यातील ‘टॅलेंट’साठी ओळखला गेला. सुरूवातीला यामुळे ट्रोल ही झाला. त्यानंतर त्यानं त्याचं टॅलेंट जगाला दाखवलं. मिडल ऑर्डरमध्ये खेळणारा रोहित ओपनर झाला आणि त्याच्या बॅटमधून रन वाहू लागले. तो टेस्टमध्ये चालणार नाही असा अनेकांचा अंदाज होता. गेल्या काही वर्षात ही देखील परिस्थिती बदलली आहे. रोहित शर्मा आता तीन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन आहे. गेल्या 9 वर्षांपासून दुर्मिळ झालेली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या 130 कोटी लोकांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर पेलणाऱ्या रोहितचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी (30 एप्रिल 1987) रोहितचा जन्म झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त रोहितबद्दलच्या 20 मनोरंजक गोष्टी (20 Interesting Facts about Rohit Sharma) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

नागपुरात जन्म: रोहित शर्माचा जन्म नागपूरमध्ये झाला. त्याची आई तेलुगू भाषिक आहे. त्यामुळे पक्का मुंबईकर असलेल्या रोहितला मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह तेलुगू भाषा देखील येते.

डोंबिवली कनेक्शन : रोहित शर्माची शाळा बोरिवलीमधील असली तरी तो लहाणपणी डोंबिवलीमध्ये राहत असे. काही वर्षांनी तो त्याच्या आजी-आजोबांकडे बोरिवलीत राहयला गेला.

गरीब कुटुंब : रोहित शर्माच्या आईचे नाव पौर्णिमा शर्मा तर वडिलांचे नाव गुरूनाथ शर्मा आहे. रोहितचे वडील एका ट्रान्सफोर्ट फर्मच्या स्टोअर हाऊसमध्ये कर्मचारी होते.

ऑफ स्पिनर म्हणून निवड : रोहित शर्मा पहिल्यांदा क्रिकेट ट्रायलसाठी गेला तेव्हा नेटमध्ये बॅटींग करण्यासाठी मोठी रांग होती. ते पाहून त्यानं ऑफ स्पिनर म्हणून टेस्ट दिली आणि त्याची निवड झाली. रोहितचे कोच दिनेश लाड यांनी त्याची गुणवत्ता हेरली आणि त्याला बॅटर (20 Interesting Facts about Rohit Sharma) बनवले.

Explained: रोहित शर्मा टेस्टमध्येही बेस्ट कॅप्टन ठरेल, वाचा 5 प्रमुख कारणं

शाळेतील फी माफ : रोहित शर्माला क्रिकेटमध्ये प्रगती करता यावी म्हणून कोच दिनेश लाड यांनी बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल हायस्कुलमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. रोहितच्या पालकांना त्याची फीस भरणे शक्य नव्हते. त्यावेळी शाळेनं त्याच्या क्रिकेटमधील गुणवत्तेचा विचार करून त्याची फिस माफ केली.

45 अंडी खाल्ली: रोहित शर्माला लहाणपणी अंडी खायला खूप आवडत. त्यानं एकदा शर्यत म्हणून एकाच वेळी 45 अंडी खाल्ली होती.

45 नंबरची गोष्ट: रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 45 नंबरची जर्सी घालतो हे सर्वांना माहिती आहे. त्याला हा नंबर त्याच्या आईनं सुचवला होता. 2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान त्याला जर्सीचा नंबर सांगायचा होता. रोहितनं सुरूवातीला 19 नंबरची मागणी केली होती. पण, तो नंबर उपलब्ध नव्हता. त्यानंतर त्यानं 45 ची निवड केली.

45 नंबरची महती: रोहितनं काही काळ 77 नंबरची जर्सी घातली. त्यानंतर तो पुन्हा 45 नंबरवर शिफ्ट झाला. त्याचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट तसंच त्याच्या कारच्या नंबरमध्येही 45 हा आकडा (20 Interesting Facts about Rohit Sharma) आहे.

अंडर 19 वर्ल्ड कप : रोहित शर्मा 2006 साली टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळला. त्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया पाकिस्तानकडून पराभूत झाली. त्या फायनलमधील रोहितसह चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि पियूष चावला हे खेळाडू पुढे टीम इंडियाकडून खेळले.

पहिली T20 सेंच्युरी : T20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी करणारा रोहित हा पहिला भारतीय आहे. 2006- 07 साली झालेल्या नॅशनल T20 स्पर्धेत रोहितनं गुजरातविरूद्ध 45 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. या खेळीत त्यानं 13 फोर आणि 5 सिक्स लगावले होते.

 झोपाळू आणि विसराळू : रोहित शर्मा हा टीम इंडियातील झोपाळू आणि विसराळू क्रिकेटपटू आहे. तो एकदा भारतीय टीमसोबत विदेश दौऱ्यावर जाताना घरी पासपोर्ट विसरला होता.

रितिकाची भेट : रोहित शर्माच्या बायकोचं नाव रितिका सजदेह आहे. एका प्रसिद्ध स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाची ती बहिण आहे. एका जाहिरातीच्या कामाच्या निमत्तानंच दोघांची पहिली भेट झाली.

सलमान खानचा नातेवाईक : रितिका सजदेहचा भाऊ बंटी सजदेह हा सलमान खानच भाऊ सोहेल खानचा मेहुणा आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि सलमान खान हे देखील लांबचे नातेवाईक आहेत.

लग्नाच्या वाढदिवशी डबल सेंच्युरी : रोहित शर्मा आणि रितिका यांनी 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले. रोहितनं त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरूद्ध डबल सेंच्युरी झळकावली (20 Interesting Facts about Rohit Sharma) होती.

रोहितनं 3 वर्षांमध्ये पलटवली बाजी, टीकाकारांना गप्प करत बनला नंबर 1

रोहितच्या 3 डबल सेंच्युरी :  वन-डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी करणारा रोहित हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्यानं श्रीलंकेविरूद्ध कोलकातामध्ये 264, ऑस्ट्रेलिया विरूद्ध बेंगळुरूमध्ये 209 आणि श्रीलंकेविरूद्ध मोहालीमध्ये नाबाद 208 अशा तीन डबल सेंच्युरी केल्या आहेत.

हिटमॅन नाव कसे मिळाले? : रोहित शर्माला हिटमॅन हे नाव त्याला ओळखणाऱ्या प्रोडक्शन टीममधील एकानं दिलं आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध बेंगुळरूमधील वन-डे डबल सेंच्युरी झळकावल्यानंतर त्याला हे नाव दिले. त्या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या एका सदस्यानं ते नाव ऐकलं आणि त्यानं लगेच ‘ऑन एअर’ रोहितचं नवं बारसं केलं.

 गांगुलीनंतर रोहित : वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉक आऊट मॅचमध्ये सेंच्युरी करणारा सौरव गांगुलीनंतर रोहित शर्मा हा दुसरा भारतीय आहे.

एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सेंच्युरी : रोहित शर्मानं 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये 5 सेंच्युरी झळकावल्या आहेत. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सेंच्युरी करण्याचा रेकॉर्डही रोहितच्या नावावर आहे.

सर्वात वेगवान सेंच्युरी : रोहित शर्मानं T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात वेगवान म्हणजेच फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली आहे. या यादीत तो दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरसह पहिल्या क्रमांकावर आहे.

आयपीएल विजेतेपद: रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून 5 तर डेक्कन चार्जर्सकडून 1 अशी 6 आयपीएल विजेतेपद पटकावली आहेत. 6 आयपीएल विजेतेपद पटकावणारा तो एकमेव खेळाडू (20 Interesting Facts about Rohit Sharma) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: