महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli). टीम इंडियाचे (Team India) अलिकडच्या काळातील दोन कॅप्टन. एक कॅप्टन कुल तर दुसरा आक्रमक. एक मैदानावर कोणत्याही भावनांचं प्रदर्शन न करणारा..तर दुसरा मैदानावर सर्व काही व्यक्त करणारा. एकाच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. तर दुसऱ्याच्या काळात टीम टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 बनली. टीम इंडियाच्या या दोन यशस्वी कॅप्टन्सचा ऑस्ट्रेलियात (Australia) रेकॉर्ड कसा आहे ते पाहूया….

2011-12   कॅप्टन महेंद्रसिंह धोनी

भारताने त्याच वर्षी वर्ल्ड कप जिंकला होता. भारताच्या टेस्ट टीममध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे दिग्गज खेळाडू तर विराट कोहली आणि आर. अश्विन हे दमदार तरुण खेळाडू होते. साहजिकच धोनीच्या त्या टीमकडून देशाला मोठी अपेक्षा होती.

धोनी ब्रिगेडने साफ अपेक्षा भंग केला. टीम इंडियाने सीरिजमधील सर्व चार टेस्ट गमावल्या. त्यापैकी दोन टेस्टमध्ये तर इनिंगने पराभव झाला. धोनीच्या बचावात्मक कॅप्टनसीवर जोरदार टीका झाली होती. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोनच भारतीय बॅट्समन्सने त्या सीरिजमध्ये 35 पेक्षा जास्त सरासरीने रन्स केले. भारताकडून झहीर खानने सर्वात जास्त 15 विकेट्स घेतल्या. स्लो ओव्हर रेटमुळे महेंद्रसिंह धोनीला चौथी टेस्ट खेळता आली नव्हती.

2014-15, कॅप्टन महेंद्र सिंह धोनी/विराट कोहली

भारतीय क्रिकेटमधल्या विराट पर्वाला याच काळात सुरुवात झाली. विराटने या सीरिजमध्ये तब्बल चार सेंच्युरीसह 87 च्या सरासरीने 692 रन्स केले. त्याला मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी उत्तम साथ दिली. त्या दोघांनीही 50 पेक्षा जास्त सरासरीने रन्स केले. मोहम्मद शमी हा भारताचा सर्वात यशस्वी बॉलर होता.

विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म टीम इंडियाला सीरिज जिंकून देऊ शकला नाही. टीम इंडियाने ती सीरिज 0-2 ने गमावली. महेंद्रसिंह धोनीनं सीरिजमधील एक टेस्ट बाकी असताच टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेत सर्वांना धक्का बसला. धोनीच्या जागी विराट कोहली टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन बनला.

2018-19, कॅप्टन विराट कोहली

टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली. ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. सिडनी टेस्टमध्ये पाऊस आला नसता तर हे अंतर आणखी वाढले असते. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा विराट कोहली हा पहिला आशियाई कॅप्टन ठरला.

टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजारानं सर्वात जास्त 521 रन्स काढले. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच खेळणाऱ्या ऋषभ पंतनेही 50 पेक्षा जास्त सरासरीने रन्स काढले. भारताकडून बुमराहने सर्वात जास्त 21 विकेट्स घेतल्या. त्याला शमी आणि इशांत शर्माने मोलाची साथ दिली. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर बंदीवासात असल्याचा मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला.

टेस्टविजयपराभवड्रॉ
महेंद्रसिंह धोनी5041
विराट कोहली6222
महेंद्रसिंह धोनी – विराट कोहलीची तुलमात्मक आकडेवारी

विराट कोहली यंदा केवळ एक टेस्ट खेळून कौटुंबिक जबाबादारीमुळे मायदेशी परतणार आहे. ॲडलेडमध्ये होणारी पहिली टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलियातील आपला कॅप्टनसीचा रेकॉर्ड आणखी मजबूत करण्याचा विराटचा प्रयत्न असेल.

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: