फोटो – सोशल मीडिया

भारतीय क्रिकेटमध्ये ‘हिटमॅन’ पर्व सुरू झाले आहे. रोहित शर्माची T20 नंतर वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहितनं पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका सीरिजपासून (India vs South Africa ODI Series 2022) ही जबाबदारी सांभाळेल. भारतीय वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विराट कोहलीची (Virat Kohli) जागा रोहित घेणार आहे. विराटची जागा रोहित घेत असल्याने भारतीय क्रिकेटच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. रोहितचा कॅप्टनसीचा यशस्वी रेकॉर्ड हे त्याचे मुख्य कारण आहे. रोहित शर्मा हा यशस्वी कॅप्टन (Why Rohit Sharma Successful Captain)  का आहे? याची 5 प्रमुख कारणे पाहूया

विजेतेपदांचा रेकॉर्ड

टीम इंडियाचा वन-डे कॅप्टन म्हणून 70 टक्के मॅच जिंकूनही विराटला कॅप्टनपदावरून काढण्यात आले. विराटपेक्षा रोहितवर जास्त विश्वास दाखवण्यात आलाय. याचे मुख्य कारण म्हणजे रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीमचा एखादी स्पर्धा जिंकण्याचा रेकॉर्ड हे आहे.

विराट कोहलीच्या काळात ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी टीम इंडियाला तीन वेळा आली होती. यापैकी दोनदा फायनलमध्ये (Champions Trophy 2017, WTC 2021)  आणि एकदा सेमी फायनलमध्ये (Cricket World Cup 2019) टीम इंडियाचा पराभव झाला होता. नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडिया सेमी फायनलही गाठू शकली नाही. आयसीसी स्पर्धांमधील अपयश हे विराटची कॅप्टनसी जाण्याचं मुख्य कारण आहे.

रोहित शर्माचा कॅप्टन म्हणून रेकॉर्ड उजवा आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) मागील 9 आयपीएल सिझनमध्ये 5 विजेतेपद पटकावली आहेत.  विराट कोहलीला कॅप्टन म्हणून आयपीएल स्पर्धा जिंकता आली नाही. त्याचबरोबर रोहितनं काळजीवाहू कॅप्टन म्हणून देखील आशिया कप आणि निदहास ट्रॉफी या दोन पेक्षा जास्त टीमचा सहभाग असणाऱ्या स्पर्धा जिंकल्या (Why Rohit Sharma Successful Captain) आहेत.

‘या’ 5 कारणांमुळे रोहित शर्मा ठरेल विराट कोहलीपेक्षा चांगला कॅप्टन!

मैदानात उतरण्यापूर्वी तयारी

‘मी क्रिकेटच्या मैदानात नेहमीच 120 टक्के योगदान देतो’, असे वक्तव्य विराटने काही दिवसांपूर्वी केले होते. खेळाडू म्हणून मैदानात 120 टक्के योगदान देणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण कॅप्टनची जबाबदारी ही फक्त मैदानात नसते तर मैदानाच्या बाहेर सुरू होते.

मोठ्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली टीम आणि मोठ्या मॅचमधील Playing 11 या गोष्टी टीमच्या विजेतेपदामध्ये निर्णायक घटक असतात. हे भारतीय क्रिकेट फॅन्सपेक्षा जास्त चांगलं कुणीही सांगू शकणार नाही.

कोहली-शास्त्रीच्या कार्यकाळात अन्यत्र सर्व ठिकाणी दणदणीत कामगिरी केल्यानंतरही मोठ्या स्पर्धेत या 2 कारणांमुळे टीम इंडियानं निर्णायक विजेतेपद गमावले आहे. रोहितला कॅप्टन म्हणून योग्य टीम निवडण्याचा आणि त्या टीमसोबत विजेतेपद जिंकण्याचा अनुभव आहे. कॅप्टन म्हणून त्याची तयारी मैदानात उतरण्यापूर्वी बराच आधी सुरू झालेली असते. त्यामुळे रोहित शर्मा हा यशस्वी कॅप्टन (Why Rohit Sharma Successful Captain) आहे.    

खेळाडूंना पाठिंबा

रोहित शर्माची मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनसीची पद्धत पाहिली तर त्याने प्रत्येक मॅचमध्ये समान प्लेईंग 11 वर भर दिला आहे. एखादा खेळाडू फॉर्मात नसेल, त्याला एखादी मॅच खराब गेली तरीही त्याने त्याला त्यामधून सावरण्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे.

स्वत: रोहितला महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni)  या प्रकारचा पाठिंबा सातत्याने दिला त्यामुळेच तो घडला. त्यामुळे फॉर्मात नसलेल्या खेळाडूंची मानसिकता त्याला चांगली माहिती आहे. खेळाडूंच्या क्षमतेवरील त्याचा पूर्ण विश्वास असतो.

रोहित शर्मानं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या यशाचे ‘गुपित’

Instinct वर भर  

अधुनिक क्रिकेटमधील डेटाच्या महासागरात ‘मॅच अप’ वर मोठा भर दिला जातो. मॅचमधील काही विशिष्ट कालावधीमध्ये पाचव्या आणि सहाव्या बॉलरच्या ओव्हर पूर्ण करणे. डावखुरे बॅटर्स मैदानात असतील तर त्यांच्यापासून डावखुऱ्या बॉलर्सना दूर करणे हे याचे प्रमुख उदाहरण आहे.

रोहित या पद्धतीपासून दूर असतो. प्रमुख बॉलर्सचा वापर करत प्रतिस्पर्धी टीमला लवकरात लवकर बॅकफुटवर ढकलण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तो समोरची टीम चूक कधी करेल याची वाट पाहत नाही. तर आक्रमक चाली रचत त्यांना चुका करायला भाग पाडतो. रोहित शर्मा हा महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच आतल्या मनाचा कौल ऐकून मैदानात निर्णय घेणारा खेळाडू आहे. तो ओल्ड स्कुलचा कॅप्टन असला तरी त्याच्या डोक्यातील डावपेच नेहमीच पुढचे डावपेच तयार असतात. त्यामुळेच खेळाडूंचा योग्य वापर करणे त्याला जमते.

बुमराह, पांड्या बंधू, राहुल चहर, मयांक मार्कंडेय, सूर्यकुमार यादव, इशान किशन या सर्व देशांतर्गत क्रिकेटमधून आलेल्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सनध्ये महत्त्वाची जबाबदारी देत त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ रोहितने करून घेतला आहे. त्याचा त्या खेळाडूंच्या करिअरसोबतच टीमलाही फायदा (Why Rohit Sharma Successful Captain) झाला आहे.

Captain Cool, Communication Clear  

चांगला कॅप्टन हा मैदानातील परिस्थितीमध्ये वाहवत जात नाही. तो त्या परिस्थितीचा त्याच्या कॅप्टनसीवर, बॉलिंग आणि बॅटींगमधील बदलांवर परिणाम होऊ देत नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये युजवेंद्र चहलने सुरुवातीला खराब बॉलिंग केली. रोहितनं तरीही त्याची बॉलिंग बंद केली नाही. त्याने चहलवर विश्वास दाखवला. चहलने विकेट घेत कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला. स्वत: चा आत्मविश्वास परत मिळवला.

आयपीएल 2020 च्या फायनलमध्ये राहुल चहरला का खेळवलं नाही याचं कारण रोहितनं त्याला मॅचपूर्वीच समजावले होते. विराटच्या कॅप्टनसीमध्ये अगदी महत्त्वाच्या मॅचमध्येही अनाकलनीय बदल पाहयला मिळाले आहेत. त्याचबरोबर फिल्डिंग करताना टीम दबावात असेल तर विराटनं कॅप्टन म्हणून रोहितपेक्षा जास्त चुका केल्या आहेत.

विराटनं बाहेर बसवलेल्या बॉलरच्या वर्षभरात 50 विकेट्स पूर्ण, सेंच्युरीही झळकावली

आयसीसी स्पर्धेतील मोठ्या मॅचमध्ये या चुका टीम इंडियाला भारी पडल्या आहेत. त्याचबरोबर टीममधील वाढती स्पर्धा लक्षात घेता प्रत्येक खेळाडूशी त्याच्या टीममधील जबाबदारीबाबत योग्य प्रकारे संवाद साधला जाईल अशी घोषणा टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) केली आहे. आगामी दीड वर्षातील आयसीसी स्पर्धांचा विचार करता ही आवश्यक बाब आहे. खेळाडूंशी क्लियर कम्युनिकेशन ठेवण्याच्या बाबतीतही रोहित सरस असल्याने तो आजवर यशस्वी कॅप्टन (Why Rohit Sharma Successful Captain) ठरला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading