फोटो – ट्विटर/@DineshKarthik

तामिळनाडूनं (Tamil Nadu) सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेचं (Syed Mushtaq Ali Trophy 2021) विजेतेपद पटाकवलं आहे. अहमदाबादच्या सरदार पटेल मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये तामिळनाडूनं बडोद्याचा (Baroda) 7 विकेट्सनं पराभव केला. सात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये स्पर्धेतील सर्व मॅच जिंकत तामिळनाडूनं हे निर्भेळ विजेतेपद पटकालं आहे. यापूर्वी दिनेश कार्तिकच्याच (Dinesh Karthik) कॅप्टनसीखाली आयपीएलपूर्व काळात म्हणजेच 2006-07 साली तामिळनाडूनं या स्पर्धेचं विजेतपद पटकावलं होतं.

( वाचा : दिनेश कार्तिकच्या करियरमधील चढ-उताराची गोष्ट! )

सात विकेट्सनं विजय

तामिळनाडूला विजयासाठी 121 रन्सचं टार्गेट मिळालं होतं. ओपनर एन जगदीशन (N. Jagadeesan) आणि हरी निशांत यांनी चांगली सुरुवात केली. जगदीशन 14 रनवर आऊट झाला. तर निशांतनं 35 रन काढले.

( वाचा : SMAT: कार्तिकची धमाकेदार खेळी, तामिळनाडूची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक )

निशांत आऊट झाल्यानंतर अनुभवी दिनेश कार्तिकनं फायनलमध्ये स्वत:ला प्रमोशन दिलं. त्यानं बडोद्याच्या बॉलर्सना परतण्याची कोणतीही संधी दिली नाही. कार्तिक आणि बाबा अपराजित यांनी धावफलक सतत हलता ठेवला. कार्तिक 16 बॉलमध्ये 22 रन काढून आऊट झाला. त्यानंतर तामिळनाडूचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॅट्समन शाहरुख खाननं फटकेबाजी करत 12 बॉल आधीच मॅच संपवली. शाहरुख खाननं 7 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं नाबाद 18 रन काढले. तर बाबा अपराजित 29 रन काढून नाबाद राहिला. आयपीएल ऑक्शनपूर्वी ही फायनल बारकाईनं पाहणाऱ्या सर्व टीमना प्रभावित करण्याची या तरुण बॅट्समन्सना ही शेवटची संधी होती.

तामिळनाडूचा सिद्धार्थ हिरो!

अहमदाबादमध्ये यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये स्विंगला मदत मिळत होती. फायनलमध्ये पिचनं स्पिनर्सला मदत केली. तामिळनाडूच्या स्पिनर्सनं त्याचा पूर्ण फायदा घेतला. कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) काही दिवसांपूर्वीच एम.सिद्धार्थला (M. Siddharth) करारमुक्त केलं आहे. तोच एम. सिद्धार्थ तामिळनाडूच्या बॉलिंगचा हिरो ठरला. त्यानं पहिल्या ओव्हरची सुरुवात ‘नो बॉल’नं केली. त्यानंतर बडोद्याचा कॅप्टन केदार देवधरनं (Kedar Devdhar) त्याला दोन सलग चौकार मारले. सिद्धार्थनं त्याच ओव्हरमध्ये केदारला आऊट करत कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन देऊन 1 विकेट घेणाऱ्या सिद्धार्थनं पुढच्या तीन ओव्हरमध्ये फक्त 9 रन देत आणखी तीन विकेट्स घेतल्या.

किशोरला संधी मिळणार का?

या स्पर्धेत सातत्यपूर्ण बॉलिंग करणाऱ्या साई किशोरनं (Sai Kishor) फायनलमध्येही त्याचं काम चोख केलं. त्यानं चार ओव्हर्समध्ये एक मेडन टाकत फक्त 11 रन दिले. त्याला एकही विकेट मिळाली नसली तरी त्यानं बडोद्याच्या बॅट्समनला बांधून ठेवलं होतं. किशोरनं या संपूर्ण स्पर्धेत फक्त 4.82 च्या इकॉनॉमी रेटनं रन दिले आहे. साई किशोर मागील संपूर्ण IPL सिझन चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) बेंचवर बसून होता. आता या सिझनमध्ये चेन्नईच्या टर्निग पिचवर किशोरला धोनी संधी देणार का? हे पाहवं लागेल.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : विजय शंकर, ‘ऑलराऊंडर इन वेटिंग )

तामिळनाडूच्या बॉलर्सच्या अचूक बॉलिंगमुळे बडोद्याची एकवेळ अवस्था 6 आऊट 36 झाली होती. त्यावेळी विष्णू सोळंकीनं (Vishnu Solanki)  एकाकी लढा दिला. त्याची हाफ सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. त्यानं शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे बडोद्यानं 120 पर्यंत मजल मारली, पण फॉर्मात असलेल्या तामिळनाडूपुढं 121 हे टार्गेट अखेर कमी पडलं.

20 रन देऊन बडोद्याच्या चार विकेट्स घेणाऱ्या एम. सिद्धार्थला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading