फोटो – ट्विटर, आयसीसी

ऑस्ट्रेलियन टीम (Australia Cricket Team) सलग 5 T20 सीरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर वर्ल्ड कप खेळण्यासाठी आली होती. ‘आम्ही इथं वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलो आहोत’ हे त्यांचा कॅप्टन आरोन फिंचचे (Aaron Finch) शब्द क्रिकेट विश्वानं फार गांभिर्यानं घेतले नव्हते. मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये आणि त्या स्पर्धांमधील मोठ्या मॅचमध्ये खेळ उंचावण्याची ऑस्ट्रेलियन स्टाईल या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पुन्हा दिसली. या ऑस्ट्रेलियन सवयीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं T20 वर्ल्ड कपमधील 14 वर्षांचा वनवास संपवला. फायनलमध्ये न्यूझीलंडला 8 विकेट्सनं पराभव करत (Australia Won The Final) पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकला.

सुरुवातीलाच झाले अर्धे काम

टॉसचा सर्वाधिक प्रभाव पडलेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचनं टॉस जिंकत अर्धी लढाई जिंकली. फिंचनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. या वर्ल्ड कपमध्ये फिंचनं 7 पैकी 6 वेळा टॉस जिंकला. त्या सर्व मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला आहे.

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या न्यूझीलंडला पॉवर प्लेचा फायदा उठवणे आवश्यक होते. ते त्यांना जमले नाही. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये त्यांनी 1 विकेटच्या मोबदल्यात 32 रन काढले. इंग्लंड आणि पाकिस्तान या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम प्रमाणे न्यूझीलंडनंही इनिंगची सुरूवात सावध आणि पारंपारिक केली. इंग्लंड, पाकिस्तान प्रमाणेच त्यांचाही पराभव (Australia Won The Final) झाला.

पाकिस्तानला पुन्हा भोवला M फॅक्टर, ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक, VIDEO

विल्यमसनचा मास्टर क्लास

न्यूझीलंडनं पहिल्या 10 ओव्हरमध्ये एकच विकेट गमावली. पण, यामध्ये त्यांनी बॉलपेक्षाही कमी म्हणजे 57 रन केले. T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा बॅटर मार्टिन गप्टील (Martin Guptil) मोठ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला. गप्टील आणि विल्यमसन जोडीला सलग 32 बॉल एकही फोर मारता आला नाही. गप्टीलनं पहिला सिक्स मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा झम्पानं त्याला जाळ्यात अडकवलं. त्यानं 35 बॉलमध्ये 28 रन काढले.

गप्टील आऊट झाला तेव्हा विल्यमसननं बराच काळ मैदानात घालवला होता. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं या स्पर्धेत एकही हाफ सेंच्युरी झळकावली नव्हती. त्यानं फायनलमध्ये मास्टर क्लास सादर केला. वन-डे, टेस्ट आणि T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये कॅप्टनसी करणारा विल्यमसन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्यानं त्याच्या बॅटींगचा क्लास सर्वात मोठ्या मॅचमध्ये म्हणजेच वर्ल्ड कप फायनलमध्ये दाखवला.

विल्यमसन पहिल्या 20 बॉलनंतर 19 रनवर खेळत होता. त्याला जोश हेजलवूडकडून एक जीवदान देखील मिळाले. शांत आणि संयमी खेळी करत असलेल्या विल्यमसननं पाहता-पाहता गियर बदलला. त्यानं 32 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये 4, 4, 6, 0, 4, 4 अशी फटकेबाजी करत 22 रन काढले. विल्यमसननं 48 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 85 रन काढले. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट 177.08 इतका होता. T20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअरची त्यानं बरोबरी केली.

विल्यमसन आणि इतर सर्व

केन विल्यमसननं 48 बॉलमध्ये 85 रन काढत त्याचा मास्टरक्लास खेळ केला. त्याचवेळी न्यूझीलंडच्या अन्य सर्व बॅटर्सनी मिळून 73 बॉलमध्ये 78 रन काढले. विल्यमसन आणि इतर सर्व हा फरक न्यूझीलंडला फायनलमध्ये भोवला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड (Josh Hazelwood) सर्वोत्तम बॉलर ठरला. त्यानं 4 ओव्हरमध्ये 16 रन देत 3 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॉलर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा भलताच महागडा ठरला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये तब्बल 60 रन दिले. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 4 ओव्हर्समध्ये 60 किंवा जास्त रन देणाऱ्या पाच बॉलरमध्ये स्टार्कचा समावेश झाला. तर फायनलमध्ये (T20 World Cup Final) ही कामगिरी करणारा तो पहिलाच बॉलर ठरला.

जोश हेजलवूड, छोट्या शहरातला मोठा हिरो!

ऑस्ट्रेलियाचा इंटेन्ट दिसला

न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 172 रन केले. ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान होते. मोठ्या रनचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक असलेला इंटेट ऑस्ट्रेलियानं सुरूवातीपासूनच (Australia Won Final)  दाखवला. कॅप्टन फिंच लवकर आऊट झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियन बॅटर्स कोशात गेले नाहीत. त्यांच्या घबराहट पसरली नाही. फिंचच्या जागी आलेल्या मिचेल मार्शनं (Mitchell Marsh) पहिल्या 3 बॉलमध्येच 6,4,4 असे 14 रन काढत जिंकण्याचा इंटेन्ट दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क प्रमाणेच न्यूझीलंडच्या मिल्नेनं स्पीडवर भर दिला. त्याचा फायदा मार्शनं उठवला.

‘Cricket मराठी’ चे भविष्य खरे

T20 वर्ल्ड कप स्पर्धेत मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचा आधार ठरणार, असं भविष्य ‘Cricket मराठी’ नं 3 महिन्यांपूर्वी व्यक्त केलं होतं. हे भविष्य खरं ठरलं.. 2021 सुरू होण्यापूर्वी मार्शच्या नावावर T20 इंटरनॅशनलमध्ये एकही हाफ सेंच्युरी नव्हती. आता 6 आहेत. मार्शनं 3 नंबरला बॅटींग करणे ही ऑस्ट्रेलियन T20 क्रिकेटसाठी यावर्षी घडलेली सर्वोत्तम गोष्ट ठरली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा व्हिलन ठरणार टीमचा आधार

मार्शनं त्याची T20 इंटरनॅशनलमधील 6 वी हाफ सेंच्युरी फक्त 31 बॉलमध्ये पूर्ण केली. T20 वर्ल्ड कप फायनलमधील ही सर्वात फास्ट हाफ सेंच्युरी आहे. त्यानं विल्यमसननं आधीच्या इनिंगमध्ये केलेला रेकॉर्ड एक बॉलनं मोडला. मार्शनं 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन काढले. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या अन्य बॅटर्सनी देखील 63 बॉलमध्ये 86 रन काढत त्यांचं योगदान दिलं.

वॉर्नर परतला

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी डेव्हिड वॉर्नर (David Warner) परतला ही T20 वर्ल्ड कप जिंकला यानंतरची या स्पर्धेतील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आयपीएल स्पर्धेत बराच काळ बेंचवर बसवण्यात आलेल्या वॉर्नरनं ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदामध्ये leading from the front ही भूमिका बजावली.

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचं पॉवर प्ले मधील अस्त्र इमाद वासिमला निष्प्रभ ठरवल्यानंतर वॉर्नरनं फायनलमध्ये इश सोधीवर हल्ला चढवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय बॅटर्सना जखडून ठेवणाऱ्या सोधीला वॉर्नरनं या मॅचमध्ये स्थिर होऊ दिलं नाही. सोधीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 रन वसूल झाले. त्यात वॉर्नरचा मोठा वाटा होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 289 रन काढणाऱ्या वॉर्नरला ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केव्हिन पीटरसन (T20 World Cup 2010) नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमनं (Australia Won The Final)  ‘मॅन ऑफ द सीरिज’ चा पुरस्कार पटकावला आहे.

ऑस्ट्रेलियन पर्वाची सुरूवात

डेव्हिड वॉर्नरला ट्रेंट बोल्टनं आऊट केल्यानंतर न्यूझीलंडसाठी थोडी संधी निर्माण झाली होती. पण, त्यावेळी मार्श आणि ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) त्यांना परतण्याची संधी दिली नाही. वॉर्नर आऊट झाल्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत मार्शनं त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण केली. मॅक्सवेलनंही त्याला तोलामोलाची साथ देत वर्ल्ड कप फायनल एकतर्फी जिंकण्याची 1999 पासून सुरू असणारी परंपरा यंदा मोडणार नाही, याची काळजी घेतली.

ग्लेन मॅक्सवेलनं टीम साऊदीला रिव्हर्स स्वीप लगावत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. या संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं नियोजनबद्ध पद्धतीनं सांघिक खेळ करत वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले. आता पुढील T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातच होणार आहे. त्याचा या चॅम्पियन टीमला फायदा होईल.T20 क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन पर्वाला (Australia Won The Final) आता सुरूवात झाली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading